भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madha Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. माढ्यात (Madha Lok sabha) आता भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटातील धैर्यशील मोहिते-पाटील आता नाराज झाले आहेत. माढा मतदारसंघातून (Madha Lok sabha) धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र त्याऐवजी रणजित सिंह निंबाळकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. मात्र तरीही आता धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यामध्ये (Madha Lok sabha) प्रचारास सुरूवात केली आहे.

मोहिते पाटील यांचा पक्ष ठरला नसला तरीही त्यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. ते निवडणूक लढणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. धौर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून (Madha Lok sabha) उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होते. मात्र भाजपने रणजित निंबाळकर यांना संधी दिली. मोहिते-पाटील गट नाराज झाल्याने भाजप नेते गिरीश महाजन हे त्यांची समजूत काढायला आले होते, मात्र त्यावेळी कार्यकर्त्यांचा रोष पाहता गिरीश महाजन यांना सामोरं जावं लागलं आहे.

मोहिते पाटलांचा प्रचारास आरंभ

मोहिते पाटील गटाने प्रचारास सुरूवात केली आहे. भाजपकडून मोहिते पाटील गटासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. करमाळा तालुक्यामध्ये प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते दिसून येत आहेत. यंदा कोणत्याही प्रकारामध्ये लोकसभा लढवायची आहे. या मानसिकतेमध्ये मोहिते-पाटील गट आहे.

धौर्यशील यांना उमेदवारी न दिल्याने राडा

भाजपने रणजित मोहिते-पाटील यांना डावललं आणि उमेदवारी दिली नाही. यामुळे आता मोहिते-पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक असून आता शरद पवार यांच्या गटातून उमेदवारी मिळवावी आणि लढावं, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. यामुळे कार्यकर्त्यांनी धौर्यशील यांना उमेदवारी न दिल्याने राडा घातला आहे.

रणजित निंबाळकर यांचं तिकीट कापून धौर्यशील मोहिते-पाटील यांना तिकीट द्या अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत कोणतंही मत मांडलं नसल्याचं बोललं जात आहे.

तसेच अजित पवार गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील रणजित निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी न देण्याबाबत सांगितलं आहे. यावर आता मोहिते पाटील बंडखोरी करणार की वेगळा पर्याय निवडणार हे पाहणं गरजेचं आहे.

News Tile – Madha Lok sabha Dhairyashil Mohite Patil News Update

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का

भावा पाठोपाठ आता वहिनींचाही ‘दादां’ना विरोध, म्हणाल्या ‘शेवटी कुटुंब हे’

‘रोहित माझ्या नेतृत्वात…’; हार्दिक पांड्याचं रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य

त्वचा आणि केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? तर शरीरात या जीवनसत्वाची असू शकते कमतरता

अखेर प्रतीक्षा संपली! आता व्हॉट्सॲप स्टेटसवर इतक्या मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करता येणार