भावा पाठोपाठ आता वहिनींचाही ‘दादां’ना विरोध, म्हणाल्या ‘शेवटी कुटुंब हे’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok sabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Baramati Lok sabha Election) तारखा आता जाहीर झाल्या आहेत. राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok sabha Election) लागलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभी फूट पडली असून आता पवार कुटुंब हे अजित पवार यांच्याविरोधात आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहिण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला पाठिंबा दिला आणि आज श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी आपल्याला पवार साहेबांना विजयी करायचं आहे, असं वक्तव्य केलं आहे. (Baramati Lok sabha Election)

श्रीनिवास पाटील हे अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत. ते आज बारामतीमध्ये बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली असून त्यांनी शरद पवार यांनाच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील सभेला संबोधित केलं आहे. त्यानंतर युगेंद्र पवार यांची आई आणि श्रीनिवास पाटील यांची पत्नी शर्मिला पवार यांनी देखील शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. (Baramati Lok sabha Election)

काही दिवसांआधी बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करत असताना अजित पवार यांनी आपल्या कुटुंबावर भाष्य केलं होतं. आता बारामतीमध्ये मला एकटं पाडलं जातंय माझ्याविरोधात माझं कुटुंब आहे, मात्र तुम्ही मतदार माझ्यासोबत असाल, असं भाष्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर आता पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी शरद पवार यांना साथ दिली असून शरद पवार यांच्यासोबत ग्रामीण भागामध्ये दौरे करताना दिसत आहेत.

काय म्हणाल्या शर्मिला पवार?

बारामतीतील काटेवाडी या शरद पवार यांच्या मूळ गावामध्ये शरद पवार यांचे कुटुंब एकवटले. त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला. यावेळी श्रीनिवास पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनी सभा गाजवली. “वडिलांचा मान राखणे गरजेचं आहे. माझ्यासाठी काय केलं? असा पवार साहेबांना विचारलेला प्रश्न म्हणजे आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं असा प्रश्न आहे”, असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.

“शेवटी कुटुंब हे वडिलधाऱ्यांपासून निर्माण होते. साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली का? आपण त्याला कारणीभूत होऊयात का?”, असा सवाल शर्मिला पवार यांनी केला आहे.

श्रीनिवास पवारही अजित पवारांवर बरसले

श्रीनिवास पवार यांनी बोलताना देखील अजित पवार यांचं नाव न घेता सख्ख्या भावाला फटकारलं आहे. “जमीन नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. आजपर्यंत जी पदं मिळाली ती पवार साहेबांमुळे मिळाली आहेत. साहेबांना म्हणायचं किर्तन करा, घरी बसा हे मला पटलं नाही”, असं श्रीनिवास पवार म्हणाले असून त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

News Title – Baramati Lok sabha Election News update

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत मनसेची एंट्री?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात खळबळ

“आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर…”; राऊतांचा भाजपला इशारा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

मैदानातच स्मृती मंधानाला आला विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल!

“जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्र विचारत नव्हतं…”, नाथाभाऊ कडाडले