‘रोहित माझ्या नेतृत्वात…’; हार्दिक पांड्याचं रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल (IPL 2024) जवळ आली आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2024 (IPL 2024) ला सुरूवात होणार आहे. याआधी आयपीएलने अनेक वळणं घेतली आहेत. रोहित शर्माला यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळता येणार नाही. कारण मॅनेजमेंट टीमने रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली आहे. यामुळे यंदाची आयपीएल (IPL 2024) चर्चेचा विषय आहे. (IPL 2024)

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेतलं तेव्हा रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर त्यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटला अनफॉलो करायला सुरूवात केली होती. काही जणांनी रोहित शर्माला पाठिंबा दिला तर काही जणांनी मुंबई इंडियन्स संघाला पाठिंबा दिला. अशा स्थितीमध्ये हार्दिक पांड्याने रोहित शर्माबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

“रोहित माझी मदत करण्यासाठी कायम सज्ज असतील. संघाने जे काही मिळवलं आहे ते रोहितच्या नेतृत्वामध्ये मिळवलं आहे. आता मला फक्त हे पुढं घेऊ जायचं आहे. रोहित शर्माचा हात फक्त माझ्या खांद्यावर असेल. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. त्याची मदत मला होईल. रोहितच्या नेतृत्वामध्ये मी खेळलो आहे, मला माहिती आहे की मी त्याचा हात माझ्या पाठिशी आहे.”, असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.

हार्दिक पांड्याने रोहित मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं होतं. त्यावेळी रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये टीम इंडियाची हार्दिकने धुरा सांभाळली होती. 2022 ते 2023 मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सची धुरा सांभाळली होती, या वर्षामध्ये गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये विजय संपादन केलं होतं.

सुरूवातीला हार्दिक पांड्याला पुन्हा मुंबई इंडियन्स संघामध्ये संधी दिली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सचे असंख्य फॅन्स खूश होते. त्यानंतर हार्दिक पांड्याला कर्णधारपद देऊन रोहितचं कर्णधारपद काढलं तेव्हा त्याने संताप व्यक्त केला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.

News Title – IPL 2024 Hardik Pandya Talk About Rohit Sharma

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”

महायुतीत मनसेची एंट्री?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात खळबळ

“आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर…”; राऊतांचा भाजपला इशारा