“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Mitkari | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी असल्याचं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार गट याद्वारे भावनिक वातावरण निर्माण करत असून हा भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे. यावेळी त्यांनी श्रीनिवास पवार यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

अमोल मिटकरी यांची टीका

आजपर्यंत राजकारणात श्रीनिवास पवार साहेब दिसून आले नाहीत. ते त्यांचा व्यवसाय सांभाळत होते. मात्र,काही दिवसांपूर्वी अजितदादांनी भाष्य केलं होतं की, माझ्या परिवारातील काही लोक माझ्यासोबत नसतील, पण बारामतीतील जनता माझा परिवार असेल. श्रीनिवास पवार काटेवाडीमध्ये काल जे काही बोलले, ही जुनीच पद्धत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

आपल्याच घरात एकमेकांच्या विरोधात लोकांना उभं करायचं. एकमेकांच्या विरोधात सख्खे भावांना उभे करून, आपण निवडणूक जिंकू असे त्यांना वाटत असेल, तर हा तुमचा भ्रम आहे. बारामतीची जनता हीच अजित पवारांचं कुटुंब असून त्यांना डाव कपट जमत नाही. अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांच्या सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत कुटील डाव आहे, असा आरोप मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

श्रीनिवास पवार साहेब हे नुकतेच राजकारणामध्ये आले आहेत. ते एवढे दिवस का शांत होते?, शरद पवारांचा, यशवंतरावांचा वारसा अजित पवारांनी सांभाळला आहे हे श्रीनिवास पवारांनी मान्य केले पाहिजे, असं भावनिक वातावरण निर्माण करून काहीही होणार नाहीये. आम्ही साहेबांच्या सोबत आहोत. या भावनिक वातावरणाचा कुठलाही फरक पडणार नाही, असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला.

श्रीनिवास पवार काय म्हणाले होते?

श्रीनिवास पवार हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू असून ते उद्योजक तथा कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. ते राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसून आले आहेत. प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. अजित दादा आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?, असं श्रीनिवास पवार म्हणालेत.

शरद पवारांमुळेच यांना सर्व पदं मिळाली आहेत. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही, असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरच मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

News Title-  Amol Mitkari On Shrinivas Pawar 

महत्त्वाच्या बातम्या –

रशियात पुन्हा पुतिनराज!; विजयानंतर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, भारताची चिंता वाढली

“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते..”, सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ

…भर स्टेडिअमवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडने मारली घट्ट मिठी; फोटो तुफान व्हायरल

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज