रशियात पुन्हा पुतिनराज!; विजयानंतर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, भारताची चिंता वाढली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vladimir Putin | रशियामध्ये पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन सत्तेवर विराजमान झाले आहेत. त्यांनी रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 88 टक्के मतांनी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे पुतिन सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

1999 मध्ये पुतिन यांनी पहिल्यांदा रशियाची सूत्र आपल्या हातात घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत ते एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. पुतिन यांचे विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर टीकाकारही सध्या तुरुंगात आहेत.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतिन विराजमान होणार

या निवडणुकीमध्ये पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी लढा दिला. पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली होती. जी निवडणूक झाली ती निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असं अमेरिकेने म्हटलं आहे.

मात्र आता पुतिन (Vladimir Putin ) विजयी झाल्यामुळे त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. विजयानंतर पुतिन यांनी थेट भारतावर निशाणा साधला आहे. त्यांनी चीनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

पुतिन यांचं भारतासाठी चिंता वाढवणारं वक्तव्य

“जागतिक स्तरावर रशिया आणि चीन दोघांच समान हित हा एक योगायोग आहे. पुढच्या काही वर्षामध्ये मॉस्को चीनसोबत संबंध विकसित करेल. दोन्ही देशांमधील संबंध अधिक भक्कम होतील”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या चीन विषयीच्या या भावना भारतासाठी नक्कीच चिंताजनक ठरणार आहेत.

विजयानंतर व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन नागरिक आणि युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैनिकांचेदेखील आभार मानले. “रशियाला घाबरवलं जाऊ शकत नाही किंवा आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. या निकालावरुन रशियन नागरिकांचा विश्वास दिसून येतो. रशियन नागरिक माझ्यावर विश्वास ठेवतात, हे निवडणूक निकालावरुन स्पष्टपणे दिसून येतं”, असं पुतिन म्हणाले आहेत.

News Title : Vladimir Putin Wins Russian Presidential Elections

महत्वाच्या बातम्या- 

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!