RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

WPL Final 2024 | स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून प्रथमच महिला प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. (WPL Prize money) दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी रात्री शानदार विजयासह ट्रॉफी जिंकली. दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव स्वीकारला. (WPL Prize Money 2024 Winners List) आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. (WPL Prize Money For Winners) आरसीबीला प्रथमच चॅम्पियन बनवण्यात फिरकीपटू सोफी मौलिनो आणि श्रेयांका पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीसाठी क्रिकेटमधील ही पहिलीच ट्रॉफी आहे, याआधी 2009, 2011 आणि 2016 मध्ये RCB च्या पुरूष संघाने अंतिम फेरी गाठली पण संघाला आयपीएल जिंकता आली नाही. महिला प्रीमिअर लीगची अंतिम फेरी जिंकणाऱ्या स्मृती मानधना अँड कंपनीला 6 कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपये मिळाले.

दिल्लीचा फायनलमध्ये पराभव

आरसीबीची अष्टपैलू एलिसे पेरीने अवघ्या नऊ डावांत 347 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली, तर आरसीबीची युवा फिरकीपटू श्रेयांका पाटीलने आठ डावांत सर्वाधिक 13 बळी घेऊन पर्पल कॅप जिंकली. एकाच संघात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असल्याने RCB ने स्पर्धेत किती वर्चस्व गाजवले हे यावरून स्पष्ट होते.

WPL Final 2024 RCB ने मारली बाजी

आरसीबीने पहिल्यांदाच WPL ट्रॉफी जिंकली. यंदा मिळाली तेवढीच गेल्या वर्षीही बक्षिसाची रक्कम होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरमध्ये पराभूत करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. आता या शेवटच्या विजयासह त्यांचा फ्रँचायझी क्रिकेटमधील 16 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळही संपुष्टात आला आहे.

जर आपण महिला प्रीमिअर लीगमधील चॅम्पियन संघाला मिळालेल्या रकमेची पाकिस्तान सुपर लीगशी (PSL) तुलना केली, तर मोठा फरक आहे. महिला प्रीमिअर लीगमधील विजेत्या संघाला PSL चॅम्पियन संघापेक्षा जवळपास दुप्पट रक्कम मिळते. आरसीबीच्या संघाला 6 कोटी रूपये मिळाले आहेत.

 

पुरस्कारांची यादी

पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द मॅच (ट्रॉफी आणि 1 लाख रुपये) – शेफाली वर्मा
सिक्सेस ऑफ द मॅच (ट्रॉफी आणि 1 लाख रूपये) – शेफाली वर्मा
सामनावीर (ट्रॉफी आणि अडीच लाख रुपये) – सोफी मोलिनेक्स
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रूपये) – जॉर्जिया वेअरहम
सिक्सेस ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रूपये) – शेफाली वर्मा
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रूपये) – श्रेयांका पाटील
फेयरप्ले अवॉर्ड – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कॅच ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रूपये) – सजीवन सजना
पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) (कॅप आणि 5 लाख रूपये) – श्रेयांका पाटील
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) (कॅप आणि 5 लाख रूपये) – एलिसे पेरी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रूपये) – दीप्ती शर्मा
उपविजेता संघ (ट्रॉफी आणि 3 कोटी रूपये) – दिल्ली कॅपिटल्स
विजेता संघ (ट्रॉफी आणि 6 कोटी रूपये) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

News Title- WPL Final 2024, Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals by 8 wickets to win the trophy, see how much the winners got here

महत्त्वाच्या बातम्या –

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

भाजपची मोठी खेळी; सोलापुरातून मोठी बातमी समोर