सोलापूर | सोलापुरात महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भाजप (Bjp) एका तरुण आमदाराला संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आमदाराचं नाव राम सातपुते आहे. भाजपने (Bjp) आमदार राम सातपुते यांची सोलापूर लोकसभेसाठी निवड केल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
भाजपची मोठी खेळी
राम सातपुते यांना पक्षाकडून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. त्यांचे मतदारसंघात दौरे सातत्याने सुरु आहेत.
प्रणिती शिंदें समोर तगडं आवाहन
सोलापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार? या मुद्द्यावरुन सातत्याने चर्चा सुरु होत्या. तसेच आमर साबळे, शरद बनसोडे, दिलीप शिंदे, नारायण बनसोडे, संगीता जाधव यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. या सर्वांना बायपास करून राम सातपुते बाजी मारतील अशी चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.
राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. राम सातपुते हे मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
महायुतीचं जागावाटप येत्या 24 तासात जाहीर होणार, अशी माहिती समोर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून जागावाटपावर भाजप हायकमांडसोबत आजच चर्चा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक
सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ