बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आज भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय. या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होत आहे.

या सभेला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती हे नेते उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत इंडिया आघाडीचे एकजूट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील सर्व बडे नेते एकाच मंचावर आल्याचं दिसत आहे.

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून अभिवादन

राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंना पहिल्यांदाच अभिवादन केलं आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) शिवाजी पार्कवरिल या सभेतून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा सुरुवातीपासून वेगळी होती. दरम्यान, 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सामील झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावर येत अभिवादन केलंय.

राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत मणिपूर पासून अनेक राज्यात भारत जोडा न्याय यात्रा नेली. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसादही मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपची मोठी खेळी; सोलापुरातून मोठी बातमी समोर

अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”