“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | ‘काँग्रेस ना होती तो क्या होता’, या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुस्तकावर भाष्य केलं आहे. या पुस्तकाच्या लेखिका मला माहिती नाहीत कोण आहेत. त्या संघ परिवारातील आहेत की कोण आहेत, मला माहिती नाही? पण या पुस्तकामध्ये काँग्रेस नेते नसते तर स्वातंत्र मिळालंच नसतं, असं या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला आहे. काँग्रेस नसती तर आता नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता ब्रिटिशांची चाकरी केली असती, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मणिपूरवरून राऊत आक्रमक

मणिपूरवरून संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मणिपूरला जातात आणि तिथे राहिले देखील. मात्र नरेंद्र मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत, याचं कारण काय आहे? तुम्ही अखंड हिंदुस्तानाची भाषा करता त्यात मणिपूर येत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला गुजरातच्या पलिकडे देश दिसत नाही. त्यांना कायमस्वरूपी 2024 मध्ये गुजरातमध्ये पाठवण्याचा निर्णय लोकांनी घ्यायचा, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीकास्र डागलं आहे. काँग्रेस नसती तर देशाला अधुनिक नेतृत्व भेटले नसतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हा देश बुवा, महाराज, तंत्र मंत्र यांच्याकडे गेला आहे. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनी या देशाला तुमच्या हातात मोबाईल, इंटरनेटसारख्या सुविधा दिल्या आहेत. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आहेत ते मोदी यांना बापजन्मात झालं नसतं. उलट भाजपने काँग्रेसचे ऋण मानायला हवं, असं राऊत म्हणाले.

वंचित आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव

वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच त्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. संविधान संकटामध्ये असताना सर्वांनी एकत्र यावं ही वंचितांची इच्छा आहे. चार जागांवर प्रस्ताव दिला आहे, त्याबाबत ते आता विचार करतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

News Title- Sanjay Raut On Congress Na hoti toh Book

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! निवडणुकीसाठी उमेदवाराला ‘इतके’ लाख रूपये खर्च करता येणार

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

कारमधून आले, पिस्तूल काढलं नंतर जे घडलं त्याने पुणे हादरलं!

मनोज जरांगेंना मोठा धक्का; अडचणीत आणखी वाढ

58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर