58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याची आई चरण कौरने वयाच्या 58 व्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चरण कौर यांनी मुलाला जन्म दिल्याची माहिती खुद्द गायकाचे वडील बलकौर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी नवजात बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी आज (17 मार्च 2024) सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळदेखील दिसत आहे.

सिद्धूच्या वडिलांची पोस्ट व्हायरल

या फोटोवर ‘Legends Never Die’ असं लिहिलेलं दिसत आहे. सिद्धूच्या वडिलांची पोस्ट व्हायरल झाली आहे. सिद्धू मुसेवालाला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Balkaur Singh (@sardarbalkaursidhu)

सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला होता.

सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. आज देखील सिद्धू मुसेवाला याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ज्यामुळे आजही गायकाची मोठी कमाई होते. युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही सिद्धू मुसेवाला याची कमाई होते.

सिद्धूच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!

मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?

क्रिकेटप्रेमींना धक्का, निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?,मोठी माहिती समोर

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य