मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gashmir Mahajani | मराठी अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) नेहमी चर्चेत असतो. त्यांच्या अभिनयाची केवळ मराठीतच नाहीतर बॉलिवूडमध्येही चर्चा आहे. गश्मीर हा महाराष्ट्रातल्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. केवळ अभिनय क्षेत्रच नाहीतर त्याला चित्रपटाची देखील जाण आहे. त्याने काम केलेल्या चित्रपटाचा आशय हा इतर अभिनेत्यांच्या चित्रपटांहून वेगळा आहे.

गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) हा एक मराठी अभिनेता आहेच, पण त्याने काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. तो सोशल मीडियावर सदैव सक्रिय असतो. त्याने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर askgashmeer नावाचं सेशन केलं त्यावेळी त्याला चाहत्यांनी प्रश्न विचारले.

मराठी इंडस्ट्री साऊथप्रमाणे प्रगती करू शकते का? :

gashmeer

askgashmeer सेशनच्या माध्यमातून चाहत्याने त्याला मराठी इंडस्ट्री साऊथप्रमाणे प्रगती करू शकते का? असा प्रश्न केला त्यावर गश्मीर महाजनी उत्तरला. त्याच्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) म्हणाला की नक्कीच आपणच आपले पाय ओढतो आणि कौतुकही करतो. हा पॅटर्न तोडायला पाहिजे, असं गश्मीर महाजनी यांनी आपलं पहिलं उत्तर दिलं आहे.

चाहत्यांशी संवाद साधता यावा म्हणून गश्मीर महाजनीने askgashmeer चे सेशन केलं आहे. तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. (Gashmir Mahajani)

गश्मीर महाजनी यांचे सिनेमे कोणते? :

देऊळ बंद, विशू, डोंगरी का राजा, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर आनंद दिघेसारख्या सिनेमांमध्ये गश्मीरने काम केलं आहे. या सिनेमांमुळे तो अधिक प्रसिद्धी झोतात आला आहे. अभिनेत्याप्रमाणे उत्तम डान्सर म्हणून देखील तो प्रसिद्ध आहे.

मराठीमध्ये सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध म्हणून त्याचा नावलैकीक आहे. तो मराठीच नाहीतर बॉलिवूडमध्ये देखील त्यानं काम केलं आहे. त्याचे सोशल मीडियावरील डान्स स्टेप्स चाहते आवडीने पाहतात.

 News Title – Gashmir Mahajani Answer To Netizens About marathi Industry

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार