मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Water Supply | मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आजपासून (15 मार्च) ते येत्या 24 एप्रिलपर्यंत शहरात पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.

महापालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात तपासणी व स्वच्छतेच्या कामांमुळे ही पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.

आजपासून 5 टक्के पाणी कपात

भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशिया खंडामधील सर्वात मोठा प्रकल्प आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी 1 हजार 910 दशलक्ष लिटर आणि 900 दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच साफसफाई व तपासणी प्रक्रिया राबविली जाते. या कामासाठीच काही दिवस ही पाणीकपात केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून संपूर्ण मुंबई (Mumbai Water Supply) क्षेत्रासाठी होणाऱ्या एकूण 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्यात 5 टक्के पाणी कपात करण्‍यात येणार आहे.

24 एप्रिलपर्यंत पाणी जपून वापरा

मुंबईमध्ये (Mumbai Water Supply) 1 मार्चपासून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.पण, राखीव साठ्यातून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. मात्र, जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्यासाठी काही दिवस 5 टक्के पानी कपात होणार आहे.

त्यामुळे पालिकेने पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे. पाईपलाईनच्या शेवटी किंवा उंच उतारावर असलेल्या भागात पाणी टंचाई जाणवू शकते.त्यामुळे पाण्याची बचत करा, असं पालिकेने म्हटलं आहे.

News Title- Mumbai Water Supply cut from today

महत्त्वाच्या बातम्या –

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा