मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranji Trophy Final 2024 | गुरुवारचा दिवस मुंबईच्या संघासह चाहत्यांसाठी खास राहिला. कारण अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भचा 169 धावांनी पराभव केला. मुशीर खान, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही चांगली कामगिरी केली. मुंबईला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. तर उपविजेत्या विदर्भनेही चांगली कमाई केली आहे.

मराठमोळ्या रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चॅम्पियन बनला आहे. मुंबईच्या संघाला बक्षीस म्हणून 5 कोटी रुपये मिळाले आहेत. मुंबईसाठी मुशीर खानने चमकदार कामगिरी केली. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मुशीरला 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य!

विदर्भचा संघ आपल्या पहिल्या डावात 105 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात त्यांना 368 धावा केल्या. तत्पुर्वी, मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. मग दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभारला अन् मुंबईने अंतिम सामना 169 धावांनी जिंकला.

विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरने दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावले. मात्र, तो त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अक्षयने 199 चेंडूंचा सामना करत 102 धावा केल्या. मुंबईला रणजी ट्रॉफी चॅम्पियन बनवणारा अजिंक्य रहाणे हा 26 वा कर्णधार ठरला आहे. 35 वर्षीय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ 42व्यांदा या सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा चॅम्पियन बनला.

Ranji Trophy Final 2024 मुंबई विजयी

सामना संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात रहाणे म्हणाला की, माझ्या संघासाठी सर्वात कमी धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी मी एक आहे, पण आज मी सर्वात जास्त आनंदी आहे. एक खेळाडू म्हणून तुम्हाला चांगल्या-वाईट काळाचा सामना करावा लागतो. हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे.

अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. सतत संघात येत असलेले युवा खेळाडू आणि रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता तो आता पुनरागमन करू शकेल, असे वाटत नाही. रणजी ट्रॉफी संपल्यानंतर आता अजिंक्य रहाणेचे संपूर्ण लक्ष 22 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलवर असेल.

News Title- Ajinkya Rahane-led Mumbai beat Vidarbha by 169 runs in Ranji Trophy Final 2024

महत्त्वाच्या बातम्या –

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा

टप्पू नव्हे तर बबिताजी ‘या’ अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये?; स्वतःच केला खुलासा!

‘सुप्रीम कोर्टात शरद पवार यांचा सन्मान; माझी छाती अभिमानाने फुलली’, आव्हाड झाले भावूक