“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jayant Patil | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. गुरूवारी नाशिक येथे भारत जोडो न्याय यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले. यावेळी संजय राऊतांसह जयंत पाटलांनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्या मालाला हवा तसा हमीभाव मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

जयंत पाटील म्हणाले की, संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात अस्वस्थ जर कोणी आहे तर तो शेतकरी. यापूर्वी देखील देशातील शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण दिल्लीचे सरकार हलले नाही. आता पुन्हा एकदा आमचा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या.

भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात

जयंत पाटलांंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करून सभेतील काही मुद्दे मांडले आहेत. ते पुढे म्हणाले की, कांद्याचे भाव पडले आहेत. निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही. केळी, संत्री बांगलादेश मध्ये निर्यात करता येत नाही. द्राक्षाची काही वेगळी अवस्था नाही. सोयाबीनचे दर पडलेले आहेत.

तसेच सत्तेवर येण्याआधी जे कापसाला दहा हजार रुपये मागत होते, सोयाबीनला सहा हजार रुपये मागत होते ती लोकं आता काहीच बोलायला तयार नाही. देशभरातील शेतकऱ्यांनी आता संघटित व्हायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

 

Jayant Patil यांचे टीकास्त्र

मोदींच्या गॅरंटीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, यांच्या (भाजप) गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे, ‘चले तो चांद तक, नही तो शाम तक’. जाहिरातींचा प्रचंड भडिमार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यांनी भारतभर पदयात्रा काढली, आता न्याय यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत.

राहुल गांधींची सुरू असलेली ही यात्रा टिव्हीवर, मोबाईलवर कुठेच दिसणार नाही. कारण तुमच्यापर्यंत काय पोहचवायचे याचा निकाल झालेला आहे. जे सोयीचे आहे तेच तुमच्या डोळ्यांना दिसते किंबहुना दाखवले जाते. त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरात बेकारी, महागाई आहे, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी जागरूक झाले पाहिजे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भविष्यकाळात तुम्ही लढाल असा विश्वास बाळगतो, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

News Title- Speaking at Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra, Jayant Patil criticized the ruling BJP
महत्त्वाच्या बातम्या –

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा

टप्पू नव्हे तर बबिताजी ‘या’ अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये?; स्वतःच केला खुलासा!

‘सुप्रीम कोर्टात शरद पवार यांचा सन्मान; माझी छाती अभिमानाने फुलली’, आव्हाड झाले भावूक

वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…