वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही घोषित होतील. यापार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये काही दिवसांपासून अनेक ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहेत. मनसे पक्षाकडून तब्बल 25 वर्षे पुणे शहरामध्ये पक्ष वाढवण्याचं काम वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे. त्यांना पुण्यातून मनसे पक्षातून लोकसभेचं तिकीट हवं होतं. मात्र मनसेनं ते दिलं नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

काही दिवसांआधी देखील वसंत मोरे( Vasant More) हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटून गेले होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी मनसेला राम राम केला आहे. ते पुन्हा आता शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये आले आहेत. माध्यमांनी त्यांना शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार काय?, असा प्रश्न केल्यावर, ते नाही असं म्हणाले. यावर पवारांनी प्रतिक्रिया दिलीये.

काय म्हणाले शरद पवार?

निलेश लंके यांच्या सोबतच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांना मोरेंबाबत प्रश्न करण्यात आला. वसंत मोरेंसोबत राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पण मला कोणीही भेटले तर म्हणून खुलासा करत बसू का?, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

पत्रकारांनी वसंत मोरे (Vasant More) यांना आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न केला त्यावर वसंत मोरेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले की नाही, मी अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. अमोल कोल्हे हे माझ्याच मतदारसंघातील आहेत. ते आज नाही अनेक दिवसांपासून माझे मित्र आहेत, असं वसंत मोरे (Vasant More) म्हणाले. मी निवडणूक लढवू इच्छित आहे. पण मला शरद पवार यांनी बोलावलं म्हणून मी आलो. अजून निवडणुका लागू द्या. अजून निवडणूक लागलेली नाही. अजून पुण्याचं मैदान मारायचं आहे. त्यामुळे आलेलो आहे पण अजून कोणतीच चर्चा झाली नाही, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

“मी भेटायला आलोय”

मी केवळ शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. माझी अमोल कोल्हे यांच्याशी मतदारसंघासंबंधीत चर्चा झाली. कारण मी त्यांच्या मतदारसंघामध्ये राहतो. मी आता बोलून काहीच उपयोग नाही. फक्त मी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. कार्य़ालयात माणसं भेट घेण्यासाठी देखील येतात, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांना मनसेनं संधी न दिल्यानं मनसेला त्यांनी राम राम केला आहे. आता ते शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये जात भेटी घेताना दिसत आहेत, यामुळे वसंत मोरे येणाऱ्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल.

News Title – Vasant More Meet With Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

‘…आता त्याचा निर्णय’; निलेश लंकेंबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आता वजन कमी करणं झालं सोपं, फक्त आठवड्यातून एकदाच…

‘तू बधिर झालेला मंत्री…’; मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर पुन्हा भडकले

पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच प्रीतम मुंडेंचा मेसेज व्हायरल, म्हणाल्या…

बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट