आता वजन कमी करणं झालं सोपं, फक्त आठवड्यातून एकदाच…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weight loss tips | अति जास्त वजन शरीरासाठी घातक असते.अति वजनमुळे अनेक आजार जडतात. त्यातच दिसण्यावरही वजनाचा परिणाम होतो. त्यामुळे वजन (Weight loss tips) हे नियंत्रणातच असायला हवे. आपली ऊंची आणि आपले वय यानुसार आपले वजन असायला हवे.

त्यातच महिला आणि पुरुष यांच्यासाठी काही वेगळे निकष लावले जातात. आताच्या काळात लहान मुलांचे देखील अति जास्त वजन असते. बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडचा प्रहार त्यातच खाण्याच्या पद्धती यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही. त्यातच व्यायामाच्या सवयी नसल्यामुळे वजन वाढतच जाते.

मग, अनेक लोक जीम लावतात किंवा काही औषधी खातात, ज्यामुळे वजन कमी होईल. मात्र, याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. बऱ्याचदा काही आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणत्याही गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. तुम्हालाही जर वजन करायचं असेल तर एक सोपी पद्धत या लेखात सांगितली आहे.

Intense Exercises वर भर द्या

वजन (Weight loss tips) कमी करण्यासाठी आहार नियंत्रणासोबतच नियमित व्यायाम महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. परंतु एका अभ्यासात असे म्हटले आहे की, आठवड्यातून एक किंवा दोनदा व्यायाम करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. संशोधनात असे दिसून आले आहे की, जर तुम्ही वीकेंडला तीव्र व्यायाम (Intense Exercises) केला तर तुम्हाला वजन कमी करण्यात जास्त फायदा होतो.

जर तुम्ही आठवड्यातून 75 मिनिटे उतीव्र व्यायाम केला तर याचा अधिक फायदा दिसून येतो. दररोज व्यायाम न करता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तीव्र व्यायाम केला तर त्यालाही तेवढाच फायदा होईल.
ऑफिसमध्ये काम करणारे, बस ड्रायव्हर आणि जे लोक जास्त वेळ बसतात त्यांना वीकेंडला व्यायामाचा फायदा होतो. कारण, अशा लोकांना रोज व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे असे लोक वीकेंडला धावणे, चढणे, हायकिंग आणि सायकलिंगसारखे व्यायाम करू शकतात.

हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमच्याकडे आठवड्यातून फक्त एक किंवा दोन तास व्यायामाचा वेळ असेल तर हळूहळू तुमच्या व्यायामाची तीव्रता तुम्ही वाढवू शकता.एकदाच तीव्र व्यायामही घातक ठरू शकतो. तुम्ही जॉगिंगपासून सुरुवात करू शकता. यानंतर हळूहळू तुम्ही व्यायामाची तीव्रता वाढवू शकता.

आहाराकडे लक्ष द्या

वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तुमचा आहारही खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करता आणि तुमचा आहार योग्य नसतो तेव्हा त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. यासोबतच जर तुम्ही जास्त तीव्रतेचा व्यायाम करत नसाल तर तुम्हाला तुमचा आहार त्यानुसार ठेवावा लागेल. अन्नातील पोषक घटकांकडे लक्ष द्या आणि शरीराच्या गरजेनुसार कॅलरीज घ्या. यामुळे तुम्ही सहज आपले वजन (Weight loss tips) कमी करू शकता.

News Title : Weight loss tips

महत्त्वाच्या बातम्या –

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया