‘तू बधिर झालेला मंत्री…’; मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर पुन्हा भडकले

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. मराठा समाजाला 10% टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं तरी देखील जरांगेंना ते मान्य नव्हतं.

अखेर त्यांनी सरकारने दिलेलं 10% आरक्षण मान्य केलं. मात्र, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्यासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान, या वेळी बोलत असताना जरांगेंनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांची बीडमध्ये संवाद यात्रा पार पडली. दरम्यान, यावेळी जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल करत त्यांच्यावर निशाणा साधला. बोलत असताना जरांगे म्हणाले की, आजपासून देवेंद्र फडवणीस यांना आहो जाहो बोलणं बंद! देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे. तुझ्या एसटी रिकाम्या जातात, आम्ही काय करावं? तू काय बधिर झालेला मंत्री आहे का? तू मला जेलमध्ये टाक मराठे काय करतात बघ!, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, “माझा मराठ्यांना शब्द आहे. जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. मस्ती करणाऱ्याला आव जाव करत नसतात. मराठ्यांच्या नादी लागाल, तर तुमचं राजकारण संपून जाईल.”

“इतक्या खालच्या थराचा गृहमंत्री”

एवढंच नाही तर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुढे म्हणाले की, “तू काय इंग्रजांच्या काळात विसरून राहिला काय? माझ्या घरावरचे पत्रे तुझ्या नागपूरच्या घरावर टाकतो का? जुन्या प्रकरणात गुन्हे दाखल करत आहे. तू मला सागर बंगल्यावर येऊ द्यायला पाहिजे होतं, मग तुला कळले असतं.”

मी ऐकत नसेल तर माझ्यावर हल्ला करण्याचा डाव टाकला आहे. सर्व पोलीस बंदोबस्त कमी केला आहे. म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गादीवर हल्ला करावा. इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यादा बघितला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

News Title : Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच प्रीतम मुंडेंचा मेसेज व्हायरल, म्हणाल्या…

बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट

‘टप्पू’सोबतच्या नात्याबाबत बबिताजीचा अखेर मोठा खुलासा!

प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!