पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच प्रीतम मुंडेंचा मेसेज व्हायरल, म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | लोकसभा निवडणुकीत बीडमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार याची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्या नाराज असल्याच्या अनेकदा बातम्या समोर आल्या. पण त्यांनी सातत्याने पक्षासोबत निष्ठा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. दुसरीकडे त्यांनी कोपरखळ्या मारणं सुरूच ठेवलं, ज्यावरून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे भासवले गेले.

अखेर अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. बीडमध्ये मुंडे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. बीड जिल्ह्याची कोणतीही निवडणूक असली तरी एकदम रंगतदार होत असते. भाजपने बुधवारी 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. (Pankaja Munde)

Pankaja Munde | प्रीतम मुंडे ॲक्शन मोडवर

बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना वगळून पक्षाने त्यांची बहीण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मागील दहा वर्ष प्रीतम मुंडे बीडच्या खासदार राहिल्या आहेत. आपल्या बहिणीला उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला आहे. यावेळी देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. कारण राज्यातील वीस जागांपैकी काही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मुनगंटीवार चंद्रपूरमधून तर गोयल उत्तर मुंबईतून निवडणूक लढतील. तर मागील काही वर्षांपासून कोणत्याही पदावर नसलेल्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) बीड लोकसभेचे तिकीट देण्यात आलं आहे.

Pankaja Munde यांना लोकसभेचे तिकीट

पंकजा मुडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्यकर्त्यांना मेसेजद्वारे शुभेच्छा देत कामाला लागण्याचे आदेश दिले. “ताई साहेबांसाठी प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे… बीड जिल्ह्याचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्यासाठी काम करणं हे आपलं भाग्य आहे आणि मतदान अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलं आहे, यासाठी जोरदार तयारी करू”, अशा आशयाचे मेसेज प्रीतम मुंडे सर्वांना पाठवत आहेत.

पंकजा मुडेंना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खरं तर आगामी निवडणुकीसाठी मुंडे बहीण भाऊ एकत्र आहेत. पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार असून अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा भाग आहे. त्यामुळे धनंजय मुंडे देखील पंकजा मुंडेंचा प्रचार करताना दिसतील यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट

‘टप्पू’सोबतच्या नात्याबाबत बबिताजीचा अखेर मोठा खुलासा!

प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ