चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Viral Video | सोशल मीडियावर नेहमी भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आता दिल्ली मेट्रोमधील एक असाच हास्यास्पद तितकाच संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये लोकांमध्ये किरकोळ वाद झाला. ज्याचे पुढे मोठ्या वादात रूपांतर झाले. व्हायरल व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी दिल्ली मेट्रोची तुलना ‘बिग बॉस शो’शी केली आणि मिश्किल प्रतिक्रिया दिल्या.

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला मेट्रोमध्ये एका सीटवरून भांडताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मेट्रोतील भांडणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @ShoneeKapoor नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार कॅप्शनमध्ये घटनेबद्दल माहिती देण्यात आली असून लिहिले की, या महिलेने एका तरूणाला सीटवरून उठण्यास सांगितले.

पुढे काय घडलं?

जेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला तेव्हा ती जबरदस्तीने त्याच्या शेजारी बसली आणि एकच राडा घातला. व्हिडीओमध्ये एक महिला सीटवरून भांडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मेट्रोच्या आत खूप गर्दी आहे आणि सीट पूर्णपणे लोकांनी भरलेली आहे. यानंतर ती महिला बळजबरीने बसते आणि म्हणते की, मला काय हरकत आहे, आम्हीही निर्लज्ज होऊ… मला काय फरक पडणार? ती महिला त्या तरूणाला धमकावते आणि म्हणते की, तुला फरक जाणवेल, तोही आता नाही, रात्री. तसेच ती महिला पुढे म्हणते की, आम्ही नियम पाळणारे लोक आहोत. आम्ही नियम का मोडायचे?

व्हायरल व्हिडीओ-

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी यावरून महिलेवर निशाणा साधला. महिलेचे वर्तन चुकीचे असल्याचा सूर नेटकऱ्यांमध्ये आहे. Viral Video अन् संताप जर पोलिसांना अशा महिलांना अटक करायची नसेल, तर किमान पुरुषांना कोणत्याही प्रकारे स्वत:चा बचाव करण्याची मुभा द्यावी, अशी प्रतिक्रिया डिंपल नावाच्या एका महिला युजरने दिली.

काही महिलांचे वागणे आवडत नाही. त्या अनेकदा ढोंग करतात की, त्या पुरुषांपेक्षा अधिक आदर आणि काळजी घेण्यास पात्र आहेत, अशा प्रतिक्रिया काही नेटकरी देत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये असे वाद आता सर्रास होत आहेत. वारंवार अशा व्हिडीओ समोर येत असतात. कधी ट्रेनमधून उतरताच ही वादाची प्रकरणे संपतात, तर कधी मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या पोलिसांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागतो.

News Title – Delhi Metro video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती चिंताजनक!

भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

आजपासून खरमास सुरू, पुढील 30 दिवस चुकूनही शुभ कार्य करू नये

उशिरा झोपत असाल तर सावधान! शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार? इंडियन बँकेत भरती प्रक्रिया सुरु