माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती चिंताजनक!

pratibha patil

Pratibha Patil | भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निवृत्त झाल्यापासून प्रतिभाताई पाटील पुण्यातच राहत आहेत. दरम्यान बुधवारी (13 मार्च) रोजी त्यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

बुधवारी म्हणजेच (13 मार्च) रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील भारती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांच्या छातीत अचानक इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. सध्या त्यांना रुग्णालयात डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, प्रतिभाताई पाटील यांना गेल्या काही दिवसांपासूनच अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र, काल अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ पुण्यातील भारती हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रतिभा पाटील यांची कारकिर्द-

प्रतिभा पाटील भारताच्या 12 व्या राष्ट्रपती आहेत. 89 वर्षांच्या प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपती पदाचा काळ 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 दरम्यान राहिला. वयाच्या 27व्या वर्षी त्या पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेल्या होत्या.

News Title : pratibha patil health update

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

आजपासून खरमास सुरू, पुढील 30 दिवस चुकूनही शुभ कार्य करू नये

उशिरा झोपत असाल तर सावधान! शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार? इंडियन बँकेत भरती प्रक्रिया सुरु

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .