उशिरा झोपत असाल तर सावधान! शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health Effects of Poor Sleep | मानवी जीवनात पुरेशी झोप अत्यंत गरजेची असते. अपुऱ्या झोपेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा थेट परिणाम शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. त्यातच बऱ्याच जणांना उशिरा झोपण्याची सवय असते. मात्र, ही सवय (Health Effects of Poor Sleep) तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते.

शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा इशाराही दिला आहे. झोपेच्या कमतरतेचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांनी पुरेशी झोप घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अलीकडील संशोधनाने चार झोपण्याच्या पद्धती शोधून काढल्या आहेत आणि त्यांचा एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले आहे. सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना त्यांचे जुने आजार पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते.

झोपण्याचे 4 पॅटर्न शोधण्यात आले

पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 3,700 लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. 10 वर्षांच्या काळात त्यांच्या झोपेच्या सवयी आणि त्यांच्या आरोग्याबाबत अभ्यास करण्यात आला. या संशोधनात चार वेगवेगळ्या झोपेच्या पॅटर्न करण्यात आल्या. यामध्ये चांगली झोप घेणारे, सुट्टीच्या दिवशी चांगली झोप घेणारे, निद्रानाश आणि थोड्या वेळासाठी झोपणारे म्हणजेच डुलकी घेत झोपणारे (Health Effects of Poor Sleep) असे हे चार प्रकारे वर्गीकरण करण्यात आले.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या मते प्रौढांनी रात्री किमान सात तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याच जणांची एवढी झोप होतच नाही. संशोधनामध्ये बरेच लोक निद्रानाश आणि काही क्षणासाठी म्हणजेच डुलकी घेणारे आढळून आले.

अपुऱ्या झोपेचा शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम

झोपण्याच्या (Health Effects of Poor Sleep) या दोन्ही पद्धती चांगल्या मानल्या जात नाहीत. 10 वर्षांपासून निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांना हृदयविकार, मधुमेह, नैराश्य आणि शारीरिक दुर्बलतेच्या अनेक तक्रारी होत्या. जे लोक दिवसा वारंवार डुलकी घेतात त्यांना मधुमेह, कर्करोग आणि अशक्तपणाचा धोका वाढला होता. संशोधनानुसार, कमी शिक्षण आणि बेरोजगार लोकांमध्ये निद्रानाशाची तक्रार दिसून आली. तर वृद्ध आणि निवृत्त लोकांमध्ये अपुऱ्या झोपेची समस्या दिसून आली.या लोकांना डुलकी घेत झोपण्याची सवय असल्याचे दिसून आले.

त्यामुळे पुरेशी झोप होणे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाथी अत्यंत गरजेचे असते. झोप झाली नाही तर, अनेक समस्या निर्माण होतात. अनेक आजार जडतात.त्यामुळे प्रत्येकाने पुरेशी आणि चांगली झोप घ्यायलाच हवी. यामुळे तुम्ही निरोगी आणि नेहमी प्रसन्न राहाल.

News Title : Health Effects of Poor Sleep

महत्त्वाच्या बातम्या –

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया