Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune News | लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तर काही ठिकाणी मंत्र्यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहे. लोकसभेसाठी तिकीट जाहीर होताच मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली.

राज्यातील 20 उमेदवार जाहीर

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा मला सार्थ विश्वास आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने मागील दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे, असेही पुण्याचे उमेदवार मोहोळ यांनी सांगितले.

Pune News । मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट

यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पक्ष नेतृत्वासह राज्यातील महायुतीच्या बड्या नेत्यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, पुणे शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करीन.

महायुतीचं जागावाटप दिवसेंदिवस रखडत चाललं होतं. पण, बुधवारी अखेर 20 जागांवर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना वगळून मंत्री पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील भाजप उमेदवार

नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील

News Title- Muralidhar Mohol has given his first reaction after BJP nominated him from Pune Lok Sabha constituency
महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय

पिंपरीतील येवले चहाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार, मालकावर गुन्हा दाखल

पुणेकर होरपळले, ‘या’ भागात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद!

पुण्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला, ‘या’ नेत्याला दिलं लोकसभेचं तिकीट