पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मोहोळ यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुण्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला
लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, अशी पहिल्यापासूनच चर्चा होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावेही चर्चेत आली होती.
पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला आहे. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन की लोकसभा उमेदवार म्हणून मला संधी दिली. देशाचे प्रधानमंत्री, अमित शाहजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहे, असं मोहोळ म्हणालेत.
व्यक्ती म्हणून माझं नाव आलं असलं तरी पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. 1992-93 साली अध्यक्ष होतो. लोक प्रतिनिधी म्हणून काम केलं. महापौर म्हणून काम केलं, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे.
गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपचं धक्कातंत्र; ‘या’ 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं
सर्वात मोठी बातमी! भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना संधी
मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!
‘या’ गोष्टींसाठी पतीला कधीच नाही म्हणू नका, अन्यथा…
बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!