बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!

Bacchu Kadu | बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सध्या राजकारणात अनेक चर्चा होत आहेत. बारामतीमध्ये पवार कुटुंबात चुरशीची लढाई दिसून येत आहे. याच ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने (Bacchu Kadu) मैदानात उतरण्याचे संकेत दिल्याने महायुती सरकारची चांगलीच अडचण वाढण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झालं आहे. त्यातच शिवतारे यांना थेट बच्चू कडूंचा पाठिंबा मिळाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

बच्चू कडू यांचा विजय शिवतारे यांना पाठिंबा

बारामतीसाठी अजित पवार सर्व विरोधकांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र शिवतारे यांनी अजित पवारांनाच आव्हान देत निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यात अजून भर म्हणजे आता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून लढले तर मी त्यांना पाठिंबा देईन, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. बच्चू कडूंच्या या भूमिकेमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. नव्या सरकारमध्ये आमच्या पक्षाचा वाटा मोठा आहे. भाजप पक्ष आम्ही स्थापन केलेल्या सरकारमध्ये सामील झाला आहे, असं ते म्हणालेत.

बच्चू कडू मविआशी चर्चेसाठी तयार

जागावाटप संदर्भात भाजप जर एक पाऊल टाकत असेल तर, आम्ही 10 पावलं पुढे टाकू. माझा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. नाहीतर महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा केल्यास आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

महायुतीतीमधील पक्षांना आमच्यासोबत बोलण्याची गरज वाटत नसेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय, असं मला वाटतं. महायुती पाळणं हे त्यांचं काम नसेल तर महायुती तोडणं आमचं काम आहे, असं स्पष्टपणे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

News Title : Bacchu Kadu supports Vijay Sivatare for Baramati Constituency

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर

अभिनेत्री करिश्मा कपूरचा सर्वांत मोठा खुलासा, म्हणाली…

“…तर मी शरद पवारांनाही सोडणार नाही”, मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी सर्वांत मोठी अपडेट समोर!