“…तर मी शरद पवारांनाही सोडणार नाही”, मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत मागणी केली आहे. तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी करा ही मागणी देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारकडे केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आडकाठी आणण्याचं काम करताना दिसत आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता सत्ताधाऱ्यांवर संतापले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

लातूरमध्ये मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. सभेनंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाज एकवटला आहे. त्यांना सुट्टी नाही. आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मी समाजाचा माणूस आहे. मी बच्चू कडू, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे, असा माझ्यावर आरोप होत आहे. मात्र मी केवळ समाजाचा आहे. मी कोणाचं ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाविरोधात बोलले तर मी त्यांच्याविरोधात बोलेल. फडणवीस यांच्यामुळे मराठा समाज एकत्र आला आहे. त्यांच्यामुळे त्यांना आता जड जात आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही एसआयटी चौकशी सुरू केली आहे. आमचं काय चुकलं? तुम्ही आयुष्यामध्ये सर्वात मोठी चूक केली आहे. तुमचं राजकीय अस्तीत्व धोक्यात आहे. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी कधी बोललो नव्हतो. पण त्यांनी गुन्हे दाखल केले असून त्यांनी ट्रॅप रचला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“…तर शरद पवार यांच्या विरोधात बोलेन”

तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहात असं बोललं जात आहे. असं विचारल्यानंतर मनोज जरांगे बरसले आहेत. उद्या शरद पवार जरी मराठा आरक्षणाविरोधात बोलले तरीही त्यांच्या विरोधात बोलेन. ही संवाद बैठक आहे. लोकं एकत्र आले आहेत. त्याचा राजकीय फटका सर्वांना बसणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला असून मराठा आरक्षणाविरोधात शरद पवार भूमिका घेतील तर त्यांनाही बोलेल असं म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला आडकाठी आणणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

News Title- Manoj Jarange Patil On Devendra fadanvis And Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

लेक त्रिशाला दत्तची संजय दत्तवर टीका?, ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ

‘निर्धार महाविजयाचा’; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

“शरद पवारांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये…”, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य

‘एका तासाची सोय होईल?’, अभिनेत्री वनिता खरातचा अत्यंत धक्कादायक खुलासा

…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान