Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्त हा नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत संजय दत्तचे नाव समाविष्ट आहे. त्याच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच पर्सनल लाईफमुळेही तो चर्चेत असतो. संजय दत्तने (Sanjay Dutt) आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्याचे तीन वेळा लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत.
संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. त्रिशाला दत्त बॉलीवूड चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे.
त्रिशाला दत्तची पोस्ट चर्चेत
त्रिशाला आता 36 वर्षांची असून तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. कधीकधी आई – वडील आयुष्यात नसणं म्हणजे आशीर्वाद असतो. अशी पोस्ट केल्याने त्रिशाला चर्चेत आली आहे. यावरूनच आता नेटकरी संजय दत्तवर देखील निशाणा साधत आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्रिशालाने म्हटलं की, “कधी कधी आयुष्यात आई-वडील नसणं आशीर्वादाप्रमाणे असतं. कारण त्यांच्यामधील जो राक्षक आहे, तो त्यांच्या नसण्यापेक्षा अधिक आहे. पण एक दिवस तुम्ही ठिक होऊन जाता…”, त्रिशालाच्या अशा पोस्टनंतर चाहत्यांनी संजय दत्त(Sanjay Dutt) याच्यावर निशाणा साधला आहे.
संजय दत्त नेटकऱ्यांकडून ट्रोल
‘लहानपणी आईचं निधन, सोबत वडिलांचं नसणं… आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट…’, असं एक यूजर म्हणाला. तर, दुसरा यूजर म्हणाला, ‘संजय दत्त तु लेकीला वेळ द्यायला हवा होता…’, असं म्हणत नेटकऱ्यांनी संजूबाबावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांचं 1987 मध्ये लग्न झालं. पण 1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे ऋचा शर्माचा मृत्यू झाला. त्यानंतर त्रिशाला तिच्या आजी-आजोबांसोबत अमेरिकेत राहत आहे. ती तिथेच वाढली. संजय दत्त (Sanjay Dutt) अनेकदा आपल्या मुलीला भेटायला जात असतो. अशात त्रिशालाने केलेल्या पोस्टमुळे आता वेगळ्याच चर्चा होत आहेत.
News Title : Sanjay Dutt daughter Trishala Dutt post in discussion
महत्त्वाच्या बातम्या –
अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video
“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली
धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO