धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai | मंगळवारी रात्री उशीरा मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील सर्वात हाय प्रोफाईल आणि सुरक्षित क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपियन सी रोडवर असलेल्या निर्जन हाइट्स इमारतीत एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. नेपियन सी रोड दक्षिण मुंबईत आहे, जिथे अनेक मोठे व्यापारी आणि राजकारणी राहतात. पोलिसांनी सांगितले की, ज्योती शाह असे मृत महिलेचे नाव असून तिचे वय 63 वर्षे आहे.

प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे की, या वृद्ध जोडप्याने काही दिवसांपूर्वी एका नोकराला घरात कामासाठी ठेवले होते, जो सध्या बेपत्ता आहे. पोलीस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून याप्रकरणी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत.

फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या पतीचे नाव मुकेश शाह असून ते एका ज्वेलरी शोरूमचे मालक आहेत. महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध जोडप्याने काही दिवसांपूर्वीच घरात एक नोकर ठेवला होता. तो आता बेपत्ता असल्याने संशय बळावला आहे. पोलीस अधिक तपास करत असून संबंधित नोकराचा शोध घेत आहेत. पोलीस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेत आहेत.

 

Mumbai तील धक्कादायक घटना

दरम्यान, दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोड परिसरात ज्योती शाह नावाच्या 63 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली. मृत महिलेच्या पतीचे दागिन्यांचे दुकान आहे. संबंधित महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक मलबार हिल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तपासादरम्यान तेथे कार्यरत असलेला एक नोकर सध्या बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

News Title- Businessman’s wife 63-year-old woman namely Jyoti Shah was found murdered in the Nepean Sea Road area in mumbai
महत्त्वाच्या बातम्या –

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!