“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर फिरत आहेत. महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत. अलीकडेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मविआत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर आता केंद्रीय मंत्र्यांनी पलटवार केला आहे.

नितीन गडकरींनी ‘दिल्ली’पुढे झुकण्याऐवजी ‘महाराष्ट्राची क्षमता’ दाखवून राजीनामा द्यावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरेंनी गडकरींना महाविकास आघाडीतून निवडून आणतो असेही म्हटले होते. आता नितीन गडकरींनी त्यांच्या विधानाला ‘हास्यास्पद’ असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना टोला

नितीन गडकरी म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे हे विधान त्यांची अपरिपक्वता दर्शवते आणि अत्यंत हास्यास्पद आहे. भाजपकडे निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची यंत्रणा आहे. शिवसेनेला भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही. आठवड्यापूर्वी एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना भाजप सोडण्याचा सल्ला दिला होता.

तसेच गडकरींनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी MVA मधून निवडणूक लढवल्यास गडकरींचा विजय निश्चित करू असे ठाकरेंनी सांगितले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ठाकरेंच्या विधानाचा उल्लेख ‘विनोद’ असा केला. ठरवून उमेदवारांना तिकीट देण्याची भाजपमध्ये यंत्रणा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari यांचे प्रत्युत्तर

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तिकीट वाटपाच्या आधी उद्धव ठाकरेंची ही सूचना आली आहे. ते हास्यास्पद आहे. यासोबतच लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप भाजपने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा केली नाही. दुसरीकडे बारामतीतून सुप्रिया सुळे पुन्हा मैदानात असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. याशिवाय अमोल कीर्तिकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवार बनवले आहे.

News Title- Senior BJP leader and Union Minister Nitin Gadkari has replied to Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप