‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Wadettiwar | अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत साड्या देण्याची योजना सुरू केली आहे. हा उपक्रम 2023 ते 2028 या कालावधीत राबवला जाणार आहे. सणांच्या काळामध्ये साड्याचं वाटप करण्याचा योजनेचा उद्देश आहे. मात्र या साड्या जुन्या आणि फाटक्या असल्याचं समोर आलं. यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आक्रमक झाले आहेत.

फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते मग देता कशाला? चेष्टा करायला? असा सवाल आता विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. कोणत्याही गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला आहे. यावर आता वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्वीट शेअर केलं आहे.

वडेट्टीवार यांचं ट्वीट

वडेट्टीवार म्हणाले की ” फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला? राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे.

2023 -2024 या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी 355 रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. इतका सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.

कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे. म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किटन किट वाटपाच्या नाराखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का?”, असं वडेट्टीवार ट्वीट करत म्हणाले.

साडी की मच्छरदाणी आहे?

अमरवातीच्या खासदार नवनीत राणा या अमरावतीच्या मतदारसंघामधील मेळघाट आदिवासी पाड्यामध्ये जात त्यांनी साड्या वाटप केल्या. प्रत्येक होळीच्या सणाला राणा दाम्पत्य त्याठिकाणी जातात. मात्र यंदा होळी सणातच आचारसंहिता असणार आहे. यामुळे त्यांनी होळी आधी काही दिवस जात साड्या दिल्या. त्यावेळी आदिवासी महिलांनी ही साडी की मच्छरदाणी आहे? असं म्हणत राणा दाम्पत्य आणि सरकारला सुनावले आहे.

News title – Vijay Wadettiwar On BJP About Low Quality Sarees Distribute

महत्त्वाच्या बातम्या

वसंत मोरेंचा मोठा खुलासा, राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगितलं

सर्वात मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना धक्का

‘मर्यादेच्या बाहेर त्रास सहन…’; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ

आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव

CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!