आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vinesh Phogat | आगामी काळात ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सध्या पात्रता फेरी सुरू आहे. पण, स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने महिलांच्या 50 किलो आणि 53 किलो गटातील निवड चाचणी सुरू होऊ दिली नाही. स्पर्धेदरम्यान काही नाट्यमय घडामोडी घडल्या. तिने अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मागितले की, 53 किलो वजनी गटातील अंतिम चाचणी ऑलिम्पिकपूर्वी आयोजित केली जाईल.

कुस्ती समितीने तिची मागणी मान्य केल्यानंतर विनेशने 50 किलो वजनी गटात शिवानीचा 11-6 असा पराभव केला आणि पुढील महिन्यात किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थान मिळविले. पण, आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती विनेश फोगाटचा 53 किलो वजनी गटात अंजूकडून 0-10 असा पराभव झाला.

आखाड्यात भलतीच कुस्ती!

विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिच्यासह इतरही काही पैलवानांनी सिंह यांच्या विरोधात दीर्घ आंदोलनाचे नेतृत्व केले होते. विनेश फोगाट 50 किलो श्रेणीच्या चाचणीसाठी SAI केंद्रात पोहोचली होती.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या कलम 7 नुसार, एका स्पर्धकाला एकाच दिवशी केवळ एका वजनी गटात भाग घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु विनेशने सोमवारी दोन वेगवेगळ्या वजनी गटातील चाचण्यांमध्ये भाग घेतला. ब्रीजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करण्यापूर्वी ती 53 किलो वजनी गटात खेळत होती. परंतु अंतिम पंघालला त्या गटात कोटा मिळाल्यामुळे विनेशने कमी वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला.

Vinesh Phogat चा पराभव अन् विजय

लेखी आश्वासनाची मागणी करत विनेशने स्पर्धा सुरू होऊ दिली नाही. तिने 50 किलो आणि 53 किलो या दोन्ही प्रकारात सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली, त्यामुळे काहीशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. तिच्या मागणीमुळे 50 किलो वजनी गटातील पैलवानांच्या तक्रारी सुरू झाल्या. विनेशला 53 किलो वजनी गटात पराभव आणि 50 किलो वजनी गटात विजय मिळाला.

चाचणीदरम्यान उपस्थित असलेल्या एका प्रशिक्षकाने सांगितले की, विनेशला सरकारकडून आश्वासन हवे आहे. डब्ल्यूएफआय पुन्हा सत्तेत आल्यास निवड धोरण बदलू शकते, अशी भीती तिला वाटते. मात्र यावर सरकार आश्वासन कसे देणार? निवडीच्या बाबतीत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. कदाचित तिला तिचे भविष्य सुरक्षित करायचे आहे. जर ती 50 किलो वजनी गटाच्या चाचण्यांमध्ये हरली तर ती 53 किलो वजनी गटाच्या चाचण्यांमध्येही शर्यतीत राहण्याची तिला खात्री करायची आहे.

News Title- Anju defeated wrestler Vinesh Phogat in the 53 kg category while Vinesh defeated Shivani 11-6 in the 50 kg category
महत्त्वाच्या बातम्या –

CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!

“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!

सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!

“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला

पांड्याच्या नेतृत्वात रोहित खेळणार नाही? IPL सुरू होण्यापूर्वी मोठी अपडेट समोर