Rohit Sharma | भारतीय संघाने अलीकडेच पार पडलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा दारूण पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. आता भारतीय खेळाडू आयपीएल 2024 साठी मैदानात उतरतील. मात्र स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या रूपाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. यावेळी रोहित शर्मा दुखापतीमुळे हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या फ्रँचायझीने कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली. रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. पण, हार्दिक पांड्याची घरवापसी होताच त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.
हार्दिक मुंबईचा नवा कर्णधार
इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. भारतीय कर्णधाराने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने धर्मशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधारपद भूषवले. बीसीसीआयने रोहित शर्माबाबत हे अपडेट दिले होते.
मात्र, रोहित शर्माची ही समस्या गंभीर आहे की किरकोळ हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जर भारतीय कर्णधाराला आणखी अडचणींचा सामना करावा लागला तर तो आयपीएल 2024 ला मुकण्याची शक्यता आहे. मात्र, आयपीएलमध्ये खेळणे किंवा न खेळण्याबाबत रोहित शर्माबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट मिळालेली नाही. आता रोहित शर्मा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 खेळू शकतो की नाही हे पाहण्याजोगे असेल.
चला सुरु करूया 🙏🥥#OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 pic.twitter.com/XBs5eJFdfS
— Mumbai Indians (@mipaltan) March 11, 2024
Rohit Sharma कडे सर्वांचे लक्ष
IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा डाव खेळला आणि हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेतले. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीशी ट्रेड करत मुंबईने त्यांच्या कर्णधाराला आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिकची घरवापसी होताच त्याला मुंबईच्या संघाचे कर्णधार बनवण्यात आले. आयपीएलच्या आगामी हंगामाला 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे.
आगामी आयपीएल हंगामात रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाची धुरा सांभाळणार आहे. याआधी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन मोसमात नेतृत्व केले होते. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले, पण तरीही रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले. मुंबईच्या फ्रँचायझीने दूरदृष्टी पाहत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
News Title- All eyes are on whether Team India captain Rohit Sharma will play for Mumbai Indians under Hardik Pandya in IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –
“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”
चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’
‘वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं वायकर आता स्वच्छ होतील’; संजय राऊत भडकले
निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार?; शरद पवार स्पष्टच बोलले