Ravindra Waikar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. रविवारी रात्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
वायकर यांना आपल्या पक्षात घेताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मागील काळात अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने ते काम करणाऱ्या सरकारमध्ये येत आहेत, असं शिंदेंनी सांगितलं. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संकटांना तोंड द्यावं लागतं. संकटांना बघून पळून जायचं नसतं. इतिहासात पळून जाणाऱ्यांची नोंद होत नाही, असं म्हणत रवींद्र वायकर यांच्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. त्यानंतर बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
“वायकर आता स्वच्छ होतील”
ईडी आणि सीबीआयचा वायकर यांच्यावर दबाव होता. मागील वर्षभर ते ताणावामध्ये होते. वायकर यांच्या पक्ष प्रवेशावर मुलुंडच्या नागड्या पोपटलालला विचारा…तो कालपासून कडी लावून बसला आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा असं म्हणणाऱ्या मोदी-फडणवीस यांना विचारा…त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं वायकर आता स्वच्छ होतील. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची गोष्ट करणाऱ्यांनी उत्तरं द्यावी, असं संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावर खुलासा करण्यात आला आहे. त्याजागी कोणीही बसवू शकतात. या पदावर भाजपमधील कोणीही असू शकेल. भाजप वॉरमधील कोणीही असू शकेल, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात दोन नेते पक्षप्रवेश करणार आहेत. अमळनेरच्या ललिता पाटील आणि सांगलीतील चंद्रहार पाटील हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
News Title- Ravindra Waikar Enter In Shinde Group After sanjay Raut React
महत्त्वाच्या बातम्या
“ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर..”, विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा
पती विकी जैनला घटस्फोट देण्याबद्दल अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!
डबल महाराष्ट्र केसरी करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश?
“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पुन्हा शरद पवार गटात जाणार?