“ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर..”, विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vivek Oberoi | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय एकेकाळी नात्यात होते. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या काही काळ विवेक सोबत नात्यात होती. यामुळे विवेक आणि सलमानचं जोरदार भांडण सुद्धा झालं होतं. मात्र ऐश्वर्याने विवेक आणि सलमान या दोघांनाही नाकारत अभिषेक बच्चनशी संसार थाटला.

ऐश्वर्या आणि विवेक यांच्याबाबत अजूनही बोललं जातं. आता विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या बाबतीत सर्वांत मोठा खुलासा केला आहे. त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर विवेकने काय केलं होतं, याबाबत तो बोलताना दिसला. ब्रेकअपनंतर विवेकला दुसरं कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. मात्र फ्लोरेन्समधील एका संध्याकाळने विवेकचं (Vivek Oberoi ) आयुष्य बदलून टाकलं.

ऐश्वर्यशी ब्रेकअप झाल्यानंतर..

याच ठिकाणी विवेक त्याची पत्नी प्रियांका अल्वाला भेटला होता. एका मुलाखतीमध्ये विवेकने त्याच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर विवेक पूर्णपणे तुटून गेला होता. मात्र प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सर्वकाही बदललं.

“माझी मावशी प्रियांकाच्या मावशीला भेटली होती. तुमची भाची आणि माझा भाचा यांची जोडी परफेक्ट होऊ शकते, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी प्रियांका न्यूयॉर्कमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होती. तिच्या नातेवाईकांनीच हे स्थळ आणलं होतं. माझ्या आईने हे पाहिलं आणि त्याआधी तिने मला अनेकदा नकार देताना ऐकलं होतं. मी सतत लग्नाची गोष्ट टाळायचो. प्रियांकाचा फोटो घरी आणल्यानंतर आई म्हणाली की ती खरंच सुंदर आहे. तू तिला एकदा भेटून बघ, अशी विनंती तिने माझ्याकडे केली”, असा खुलासा विवेकने (Vivek Oberoi ) केला.

विवेक आणि प्रियांकाची पहिली भेट अन्..

आईच्या हट्टापुढे विवेकने (Vivek Oberoi ) तिला भेटण्यासाठी होकार दिला. तेव्हा प्रियांका इटलीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी कुटुंबीयांसोबत सुट्ट्या घालवत होती. प्रियांकाला फक्त भेटून मुंबईला परत यायचं असं विवेकने ठरवलं होतं. कारण, त्याचं हृदयभंग झालं होतं. अशात त्याला कुणाशीच जवळीक साधायची नव्हती.

पुढे विवेक प्रियांकाला भेटायला गेला .या भेटीविषयी तो सांगतो की, “मी एका कॅफेमध्ये होतो आणि एका मुलीला माझ्याकडे येताना पाहिलं. यावेळी मला पहिली गोष्ट दिसली, ती म्हणजे तिने फ्लॅट चप्पल घातली होते, साधी लिननची पँट आणि त्यावर साधा टॉप परिधान केला होता. तिचे केस हलकेसे बांधले होते आणि तिने कोणताच मेकअप केला नव्हता. तिला पाहून मी मनात म्हटलं, वाह आत्मविश्वासाला मानलं पाहिजे. ती माझ्यासमोर येऊन बसली आणि म्हणाली, हाय माफ कर, मला दहा मिनिटे उशिर झाला आहे.”

या भेटीत विवेक आणि प्रियांकाची चांगली मैत्री झाली. पहिल्याच भेटीत विवेकला ती भावली. दुसऱ्या दिवशी विवेक पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला. दोघांनी यावेळी एकत्र वेळ घालवला. त्यांच्यात खूप गप्पा झाल्या. दिवस मावळल्यानंतर विवेकने तिला आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. या भेटीमुळे विवेकला त्याची जीवनसाथी मिळाली. प्रियांका आणि विवेकने 29 ऑक्टोबर 2010 मध्ये बेंगळुरूमध्ये लग्न केलं. या दोघांना वियान वीर आणि अमायरा निर्वाणा ही दोन मुलं आहेत.

News Title-  Vivek Oberoi made a big revelation

महत्त्वाच्या बातम्या –

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र