गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

Devendra Fadnavis announced modern cyber lab in Maharashtra

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात याच्या घटना अधिक घडत आहेत. त्यातच सायबर गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत मोठी घोषणा केली आहे.

नवी मुंबई पोलीस मुख्यालयात मद्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. याचे उदघाटन देवेंद्र फणवीसांच्या हस्ते झालं. या कक्षात मुद्देमाल कक्ष, रेकॉर्ड कक्ष, ई पेरवी कक्ष स्थापन करण्यात आलंय. याच उद्घाटन सोहळ्यात फडणवीस यांनी घोषणा केली.

महाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब

मुंबईतील या पुरावा व्यवस्थापन कक्षामध्ये न्यायालयात सादर करण्यात येणारे पुरावे सुस्थितीत ठेवण्यात येणार आहे. यासोबतच नवी मुंबई मध्ये देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत देशातली आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राने अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलीसी सुरू केली असून ड्रग्ज विरोधात लढा द्यावा लागणार आहे. त्यानुसार सर्व युनिटने कारवाई सुरू केली आहे. दुर्दैवाने पोलिस त्यात सामील दिसला तर 311 खाली बडतर्फ करायचा निर्णय घेतला असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन

नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेले मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. यापुढे राज्यातल्या सर्व युनिटमध्ये असं केंद्र काढावं लागणार असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

जगामध्ये डीप टेक्नॉलॉजी वाढत आहे. यामध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेली पध्दत ही एक प्रकारे ब्लॉक चेनची पद्धत आहे. त्यामुळे कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तो कोण आहे हे देखील लक्षात येते. आता ए आय वर आधारित असलेली ब्लॉक चेनही सुरू करावी, असा सल्लाही फडणवीस यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिला.

News Title-  Devendra Fadnavis announced modern cyber lab in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .