फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yusuf Pathan | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा करत आहेत. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्या उमेदवार यादीत अनेक आश्चर्यकारक नावे आहेत. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू युसूफ पठाणला बहरामपूरमधून मैदानात उतरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीएमसीने राज्यातील सर्व 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे.

खरं तर युसूफ पठाण हा गुजरातचा रहिवासी आहे. तो बराच काळ भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्याचा भाऊ इरफान पठाण हा देखील राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून क्रिकेटपटू युसूफ पठाणला मैदानात उतरवून मोठा डाव टाकला.

ममता बॅनर्जींचा मोठा डाव!

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे सध्या बहरामपूरचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी चांगलेच राजकीय वैर आहे. ममता आणि अधीर यांच्यात अनेकदा शाब्दिक युद्ध रंगले आहे. चौधरी हे सलग पाच वेळा बहरामपूरमधून खासदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जींनी युसूफवर विश्वास दाखवला.

बहरामपूर या मतदारसंघातील बहुतांश मतदार हा मुस्लिम समाजातील आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी नामांकित चेहरा देऊन काँग्रेसला मोठे आव्हान दिले आहे. खरं तर अधीर रंजन चौधरी यांच्यामुळेच राज्यात इंडिया आघाडी टिकू शकली नाही, असा आरोप अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांनी केला.

Yusuf Pathan लोकसभेच्या रिंगणात

विधानसभा निवडणूक असो की मग लोकसभा… अधीर रंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षात नेहमी शाब्दिक युद्ध रंगत असते. चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बहारमपूरमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीच्या अपूर्ब सरकारचा पराभव केला. 1999 पासून ते सतत बहरामपूरचे खासदार आहेत. तृणमूलने कडवी झुंज देऊनही त्यांना पराभूत करता आले नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपची लाट असतानाही अधीर रंजन चौधरी विजयी झाले. पण, या लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी 5 आमदार टीएमसीचे आहेत.

News Title- Former Team India player Yusuf Pathan is contesting Lok Sabha elections from Baharampur constituency from TMC
महत्त्वाच्या बातम्या –

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

‘खरंतर लक्ष्यानेच स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं…’; भावाने केला अत्यंत धक्कादायक खुलासा

“तो सारखा घरी यायचा, एकदा तर…”, रिंकू राजगुरुने सांगितला धक्कादायक किस्सा

“तुमचा नवरा सारखा मोदी-मोदी करत असेल तर…”; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला