धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

Ahmednagar news | महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर (Ahmednagar news ) येथील श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी संपूर्ण अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मुलीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर महिन्याभरापासून अत्याचार करणे सुरूच ठेवले होते. या क्रूर घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

9 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

मुलीच्या नातेवाईकांनी या नराधमांनी केलेला व्हिडिओ बघितल्यानंतर ही घटना समोर आली. यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार आणि युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोबाईलमधील व्हिडीओबाबत (Ahmednagar news ) या नारधमांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केल्यानंतर त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.

आरोपींना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ देखील या नराधमांनी बनवला. हा व्हिडिओ मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहचला. त्यावेळी त्यांना ही बाब लक्षात आली.

या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर (Ahmednagar news ) हादरलं आहे. या घटनेचा आता निषेध केला जात आहे. एवढ्याश्या चिमुकलीवर अत्याचार करताना या नराधमांना काहीच वाटले नाही का?, असा सवाल आता केला जात आहे. यांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी आता केली जात आहे.

News Title-  Ahmednagar news rape case

महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल