जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

Jay Shah । टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका पार पडली आहे. कसोटीतील पाचवा सामना 9 मार्च रोजी धर्मशाला येथे संपला. ही कसोटी मालिका 4-1 ने टीम इंडियाने जिंकली. पाचवा सामना सामना टीम इंडियाने एका डाव आणि 64 धावांनी जिंकला. यानंतर कसोटी सामन्यातील खेळाडूंस बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली.

जय शहा यांची मोठी घोषणा

कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी जय शहा (Jay Shah) यांनी एक मोठी घोषणा केली. कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआय़कडून क्रिकेट फी सोबतच इतर पैसेही मिळणार आहे. ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहनपर योजना’ जय शहा (Jay Shah) यांनी जाहीर केली आहे. तिला क्रिकेट प्रोत्साहन योजना असं नाव देण्यात आलं आहे.

‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’

‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू करताना आनंद होत आहे. आर्थिक वाढ आणि स्थिरता देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं जय शहा यांनी म्हटलं आहे. ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ 15 लाख रूपये अतिरिक्त बक्षीस संरचना म्हणून काम करेल, असेही जय शहा (Jay Shah) यांनी नमूद केलं आहे.

एका कसोटी सामन्याला क्रिकेट बोर्ड टीम इंडियाच्या खेळाडूंना 15 लाख रूपये मानधन देत आहे. जे खेळाडू 70 % हून अधिक कसोटी सामने खेळतील त्यांना 45 लाख रूपये मिळतील. तर जे खेळाडू संघाचा भाग आहेत, त्यांना 22. 5 लाख रूपये मिळतील. जे खेळाडू सिझनमध्ये 5 किंवा 6 सामने खेळतील त्यांना 30 लाख रूपये मिळतील.

एखाद्या खेळाडूने जर 50 टक्के सामने खेळले तर त्याला कोणतंही अतिरिक्त मानधन मिळणार नाही, त्यांना केवळ सामन्यासाठी 15 लाख रूपये फी दिली जाईल.

जय शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. असा निर्णय याआधी इतर कोणत्याही बीसीसीआयच्या सचिवाने घेतला नव्हता.

News Title – Jay Shah Growth Of Indian Test cricketer Monthly Fees

महत्त्वाच्या बातम्या

“काँग्रेसमध्ये सुपारी बहाद्दर, खर्गे आपल्याला एक दिवस जेलमध्ये जावं लागेल”

‘…म्हणून माझ्यावर ईडीची कारवाई’; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

‘अशा’ घरात नेहमी असतो लक्ष्मीचा वास!

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!