‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | प्रत्येकाच्या जीवनात असा एक तरी व्यक्ती असतो, ज्याचा सल्ला नेहमी ऐकला जातो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो. त्यांचा शब्द फेटाळला जात नाही. मात्र, कधी कधी हेच सल्ले व्यक्तीचे प्रचंड नुकसान करत असते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी देखील याबाबत सांगितलं आहे.

आपल्या जीवनात नेहमी चांगले आणि आपला विकास करतील, अशाच सल्ल्यांचा अवलंब करायला हवा. मात्र, कधी कधी व्यक्ती कुणाच्या तरी प्रभावाखाली इतका आंधळा झालेला असतो की, त्याला काय चुकीचं आणि काय बरोबर याची सुद्धा समज नसते किंवा त्याला ते दिसून येत नाही.

अशा व्यक्ती जे सांगतील, त्याचेच अनुकरण व्यक्ती करत असतो. मात्र, यामुळे मनुष्याची अधोगतीच होत असते. कधी-कधी आपले जवळचे व्यक्ती किंवा आपले मित्र, गुरु आपल्याला योग्य सल्ला देतात, ज्यामुळे आपण यशस्वी होतो. त्यामुळे सल्ले देणारे कोण आहेत आणि त्यांचा त्या मागील उद्देश काय आहे, या गोष्टी महत्वाच्या ठरतात. चाणक्य यांनी मनुष्याने कुणाचे सल्ले ऐकू नयेत, याबाबत अगोदरच सांगून ठेवलं आहे.

मूर्ख व्यक्तींचा सल्ला घेऊ नये

आचार्य चाणक्य (Chanakya Niti)  म्हणतात की, मूर्ख व्यक्तींचा कधीच सल्ला घेऊ नये. असे मूर्ख व्यक्ती जे सांगतील तेच केलं तर जीवनात प्रचंड नुकसान होते. तुम्ही चुकीच्या मार्गावर भटकाल. त्यामुळे मूर्ख व्यक्तींच्या बोलण्याला फार महत्व देऊ नये. त्यांच्या बोलण्याचे मनाला लावूनही घेऊ नये. चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे काहीच ज्ञान नाही, अशा व्यक्तीकडून कोणताच सल्ला घेऊ नये.

बुद्धिमान व्यक्तींशी चर्चा

मनुष्याने नेहमी बुद्धीमान व्यक्तींशी आपल्या समस्याबाबत चर्चा करायला हवी. त्यांचा विचार आणि त्यांचा दृष्टिकोन जाणून घ्यावा. अशा व्यक्ती नेहमी दुरचा विचार करत असतात. त्यांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. मात्र, कोणतीही गोष्ट करताना एकदा स्वतः विचार करणेही आवश्यक असते.

सल्ला घेण्या ऐवजी योजनेवर भर देणे

चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते प्रत्येकाचा सल्ला घेत बसण्यापेक्षा आपण योजना आखण्यात अधिक भर द्यायला हवा. व्यक्ती फक्त इतरांचे ऐकण्यात जास्त वेळ वाया घालत असतो. त्यामुळे इतरांचे ऐकत बसण्यापेक्षा त्यावेळेत काय करता येईल यार अधिक भर दिल्यास  उत्तम योजना बनते. त्यामुळे योजना आखण्यात अधिक लक्ष दिले तर यश नक्कीच प्राप्त होते.

News Title- Chanakya Niti Consultation

महत्त्वाच्या बातम्या –

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”