Delhi Crime । मुलगा आणि वडील हे नातं जगातील सर्वात भारी नातं असतं. आपल्या मुलाला कोणतीही वस्तू कमी पडू नये म्हणून बाप माणूस शेतात घाम गाळतो. कर्ज काढून आपल्या मुलाला शिक्षण देतो, मात्र दिल्लीमध्ये (Delhi Crime) एका बापाने आपल्या पोटच्या गोळ्याचा खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बापानं केला मुलाचा घात
दिल्लीतील (Delhi Crime) देवली येथे ही घटना घडली असून आपल्या मुलाच्या लग्नाआधी एक दिवस बापाने मुलाचा खून केला आहे. त्यानंतर मुलाचे वडील तिथून जयपूरला फरार झाले. तिथूनच पोलिसांनी आरोपी वडीलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गौरव सिंघल असं मृत व्यक्तीचं नाव असून त्यानं आपल्या मुलावर चाकूने 15 वेळा वार केले.
दिल्ली पोलिसांना घडलेल्या प्रकरणाबाबत 7 मार्चला माहिती मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. गौरव सिंघलवर चाकून हल्ला केला असल्याचं पोलिसांना समजलं. कुटुंबियांनी त्याला मॅक्स रूग्णालयामध्ये दाखल केलं. तेव्हा पोलिसांचं पथक त्याठिकाणी पोहोचलं. त्यावेळी डॉक्टरांनी गौरवचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. (Delhi Crime)
पोलिसांनी झालेल्या खूनाची पाहणी केली. घटनास्थळी जात पोलिसांनी रक्ताचे डाग पाहिले. मृतदेह फरफटत नेताना पाहिलं. त्यावेळी त्या रक्ताचे डाग त्याठिकाणी दिसले. त्याची हत्या ही त्याच्या वडीलांनी मारेकऱ्यांच्या साथीने केली असल्याचं पोलिस म्हणाले. (Delhi Crime)
मुलाचा खून करत वडील फरार
गौरवचे वडील आरोपी रंगलाल सिंघल हे घरातून 50 लाखांचे दागिने आणि 15 लाखांचे रोकड घेऊन फरार झाले आहेत. तर त्यांच्यासोबत इतर 3 आरोपी आहेत. गौरवचा त्याच्या वडीलांशी वाद झाला होता. त्यानंतर त्यावेळी गौरवने आपल्या वडीलांच्या कानशीलात लगावली. त्यामुळे गौरवच्या वडीलांनी सूड उगवण्यासाठी आपल्या मुलाचा खून केला.
खून करण्यामागचं कारण आलं समोर
तपासामध्ये एक अशी माहिती समोर आली आहे की, गौरवचा लग्नावरून आपल्या वडीलांसोबत वाद व्हायचा. त्याला विवाह करायचा नव्हता, म्हणून त्याचा आणि वडीलांचा सारखा वाद व्हायचा. यावरून वडीलांनेच आपल्या मुलाला संपवलं.
News Title – Delhi Crime News Update
महत्त्वाच्या बातम्या
हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 4-5 दिवसांत…
“होय, मला आदित्यला मुख्यमंत्री बनवायचं आहे”
खिशाला लागणार कात्री; ग्राहकांना मोठा शॉक
मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!
पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा