“होय, मला आदित्यला मुख्यमंत्री बनवायचं आहे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली होती. यावेळी सभेला संबोधित करत असताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपला मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “होय, मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे,” असं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

धाराशीवमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेची सभा (7 मार्च) रोजी पार पडली. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचं असल्याबाबत वक्तव्य केलं होतं. आता यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार करत, होय मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावरही टीकेचे बाण सोडले आहेत.

“क्रिकेटमध्ये जय शहाचे योगदान काय?”

क्रिकेटमध्ये जय शहाचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील क्रिकेटचे सामने गुजरातला नेण्यासाठी जय शहाला अध्यक्षपद दिलं आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आमचं सरकार का पडलं? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचा नाही असा नियम असल्याचं सांगितलं. तरीही मोदी-शहा धार्मिक प्रचार करतात. निवडणूक आयोगाने काढलेल्या नियमाचे भाजप पालन करत नाही. मी निवडणूक आयोगाचे नाव धोंड्या ठेवलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे.

“भाजपकडून नार्वेकर उभे राहणार”

शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला तो आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे, असं धक्कादायक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मोदींच्या मंत्रीमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये शेतकरी आणि आरक्षण प्रश्नी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे.

News Title – Uddhav Thackeray Replied To Amit Shah About Aditya thackeray Cm

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल