18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्यू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्यू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळले. या बैठकीत जनहिताशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या घरी पोहोचले.

मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्रीही ओक ओव्हर या शासकीय निवासस्थानावरून मंत्रिमंडळ बैठकीसाठी पोहोचले. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्यू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुका 2022 दरम्यान महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे दिसते.

मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

कारण हिमाचल सरकारने 18 ते 59 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना ‘इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी’ म्हणून दरमहा 1,500 रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 18 वर्षांवरील सर्व पात्र महिलांना आयुष्यभरासाठी 1,500 रुपये मासिक पेन्शन अंतर्गत देण्यात येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.

तसेच शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण मंत्री रोहित ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कॅबिनेट उपसमितीच्या शिफारशींवरही मंत्रिमंडळाने चर्चा केली. मर्यादित थेट भरतीद्वारे 2 हजार 401 एसएमसी शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर आणून त्यांना शासनाच्या धोरणानुसार विहित कालावधीत नियमित करून शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Himachal Pradesh सरकारचे मोठे निर्णय

दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमाचल प्रदेश वन विभागाच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांबाबात मोठा निर्णय घेण्यात आला. वनविभागातील अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे अधिकारी व कर्मचारी भरती तसेच पदोन्नती नियमानुसार पदोन्नतीस पात्र असून, त्यांना रिक्त पदाच्या आधारे सामाविष्ट करून घ्यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

याशिवाय मंत्रिमंडळाने रेडिओ थेरपी विभाग, IGMC शिमला येथे वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञाचे एक पद सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय भौतिकशास्त्रात श्रेणीसुधारित करण्याचा निर्णय घेतला.

News Title- Himachal government has announced that women in the age group of 18 to 59 will get 1500 per month
महत्त्वाच्या बातम्या –

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

गुड न्यूज! ‘पुष्पा 2’ मध्ये होणार बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारची एंट्री