शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ देत आहे. अशातच आता ऱाज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. केवळ 2 रूपयांना शेतीसाठी वापरण्यात येणारी वीज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Devendra Fadanvis)

“आठ लाख सोलार पंप मंजूर”

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख शेतीचे पंप दिले आहेत. या एकाच वर्षामध्ये आपण आठ लाख सोलार पंप मंजूर करून निधीचा पुरवठा केल्याचं सांगितलं आहे. सध्या पाच लाख सोलार पंपाची मागणी केली असून सध्या आठ लाख सोलार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“शेतकऱ्याचं वीजेचं संकट संपवू”

शेतकऱ्याचं वीजेचं संकट आम्ही संपवू असं वचन फडणवीस यांनी दिलं आहे. दीड वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं अभिवाचन त्यांनी दिलं आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार आहे. ही वीज केवळ 2 रूपये 87 पैसे ते 3 रूपये 10 पैशात वीज मिळणार आहे. हा खर्च वाचेल आणि राज्यामध्ये विजेची बचत होईल, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.

एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होतील. 100 टक्के वीज निर्मिती ही सोलारवर ट्रान्सफर होईल आणि वीज वाचेल.

“25000 रोजगार निर्मिती होणार”

औद्योगिक वीजेचा दर हा बदलणार आहे. सध्या सबसीडीवर सरकार 13000 कोटी रूपये खर्च करते. सौरपंपामुळे हा खर्च वाचेल. महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तब्बल 40 हजार कोटींची मदत होणार असून शेतकऱ्यांना गुंतवणूक देखील करता येणार आहे. 25000 रोजगार निर्मिती होणार असल्याचं उर्जामंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं आहे.

News Title – Devendra Fadanvis Announce Electricity farmers Benifit

महत्त्वाच्या बातम्या 

सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट!

कसोटी इतिहासात हे चौथ्यांदा घडलं, भारताच्या ‘या’ खेळाडूने केला ऐतिहासिक रेकॉर्ड

सत्ताधारी आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या संपूर्ण विधी

‘तो माणूस फडणवीसांचा….’; जरांगे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट