महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या संपूर्ण विधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahashivratri 2024 | महाशिवरात्रीसाठी भाविक विशेष पूजा-अर्चना करत असतात. महाशिवरात्रीसाठी (Mahashivratri 2024) एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या नाही कराव्यात, याबाबत सर्व माहिती या लेखात दिली आहे.

महाशिवरात्रीच्या पूजेबद्दल आणि शुभ मुहूर्तबद्दल या लेखात संपूर्ण माहिती दिली आहे. माघ महिन्यातील शिवरात्रीची महिमा मोठी असल्याने भाविक व्रत देखील करतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात.

त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक तप करतात. व्रत करतात. आता उद्या (8 मार्च) भोलेनाथची पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी, याबाबत मनात शंका असेल तर याचे उत्तर या लेखात दिलं आहे.

हिंदू परंपरानुसार या दिवशी भगवान शिव प्रकट झाले. या दिवशी शिवजीचा विवाह झाल्याचंही मानलं जातं. या दिवशी उपवास, मंत्र आणि रात्रीच्या जागरणाला विशेष महत्त्व देखील आहे. शिवरात्रीचा प्रत्येक प्रहर हा अत्यंत शुभ मानला जातो.

महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीची (Mahashivratri 2024) पूजा ही चार प्रहरामध्ये केली जाते. 8 मार्च रोजी पूजेचा पहिला प्रहर म्हणजे सायंकाळी 06.25 ते रात्री 09.28 वाजेपर्यंत. दुसरा प्रहार 9 मार्च रोजी रात्री 9.28 ते 12.31. तिसरा प्रहार पूजेची वेळ 9 मार्च मध्यरात्री 12.31 ते 03.34. चतुर्थ प्रहार पूजेची वेळ 9 मार्च रोजी सकाळी 03.34 ते 06.37. असा पूजेचा हा प्रहर असतो.

महाशिवरात्री निमित्त भाविक उपवास करतात. बरेच जण सकाळी लवकर उठून अंघोळ करून शुभ्र वस्त्र घालून दिवसाची सुरूवात करतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात सकाळपासूनच भाविक गर्दी करतात.

News Title- Mahashivratri 2024 Shubh Muhurat

महत्त्वाच्या बातम्या –

चाहत्यांना मोठा धक्का; RCB चा ‘हा’ खेळाडू खेळणार शेवटचा आयपीएल सीजन

महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं वक्तव्य!

धक्कादायक! ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!

बाळासाहेब थोरातांच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; मिळाली मोठी जबाबदारी