बाळासाहेब थोरातांच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; मिळाली मोठी जबाबदारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jayashree Thorat | अहमदनगर येथून मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) राजकारणामध्ये सक्रिय एन्ट्री करणार आहेत. नुकतंच बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांना संगमनेर युवक अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

जयश्री थोरात यांची राजकारणात एन्ट्री

बाळासाहेब थोरात यांची मुलगी राजकारणात एंट्री करणार आहे. डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) समाजकारणामध्ये सक्रिय होत्या. आता त्यांचं समाजकारणातील काम पाहता जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांना राजकारणामध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे नगरच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट येणार असल्याची चर्चा आहे.

थोरात यांची तिसरी पिढी राजकारणात

जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या जयश्री आता राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत. राजकारणामध्ये थोरात घराण्याची तिसरी पिढी आहे.

नगरच्या राजकारणामध्ये भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात ही तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय आहे.

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांचे काही वर्षांआधी काँग्रेस युवक पदावरून निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या घरातील आणखी एक सदस्य राजकारणामध्ये सक्रिय आहे.

जयश्री थोरात कोण?

जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. त्या कॅन्सरतज्ञ असून एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे.

News Title – Jayashree Thorat Enter In Politics

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्रींचं सौंदर्यही पडेल फिकं, अंबानीच्या सोहळ्यातील ‘खास’ व्यक्तीने वेधलं लक्ष

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक, वाचा आजचं राशीभविष्य

टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर!

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

सकाळी उपाशी पोटी Coffee पिणं ठरू शकतं अत्यंत धोकादायक!