टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TET Examination | शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा आयोजित केली जाते. याच परीक्षेसंदर्भात (TET Examination) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असून याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

टीईटी परीक्षेबाबत मोठा निर्णय

मराठी, इंग्रजी, उर्दू अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने राज्य शासनाला सादर केला होता. हाच प्रस्ताव आता राज्य शासनाने मान्य केला आहे.

त्यामुळे आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Examination) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

टीईटी परीक्षा ऑफलाइन होणार

राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30 हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 11 हजार पदांची भरती करण्यात आली आहे, तर उर्वरित रिक्त पदांवर येत्या काळात भरती होणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET Examination) ही वर्षातून दोनवेळा होणे अपेक्षित असते. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे टीईटी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. आता लवकरच या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

News Title- TET Examination 2024 will be offline 

महत्वाच्या बातम्या-

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो