850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cricket | भारत आणि इंग्लंड यांच्यात 7 मार्चपासून धर्मशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एका भारतीय खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. हा खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शाहबाज नदीम आहे. झारखंडच्या या फिरकीपटूने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय संघात भविष्य दिसत नसल्याने त्याने हे पाऊल टाकले. जेणेकरून त्याला इतर लीग क्रिकेट खेळता येईल.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा 34 वर्षीय फिरकीपटू म्हणाला की, मला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. मला समजले आहे की, आता मी टीम इंडियामध्ये परतू शकत नाही. त्यामुळे मला युवा खेळाडूंच्या वाटेत अडथळा निर्माण करायचा नाही. मला राष्ट्रीय संघात भवितव्य दिसत नसल्याने हा निर्णय घेतला आहे.

शाहबाज नदीमचा क्रिकेटला रामराम

नदीमने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. 19 ते 22 ऑक्टोबर 2019 दरम्यान रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर 5 ते 9 फेब्रुवारी 2021 दरम्यान, त्याने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

या दोन सामन्यांत त्याने एकूण आठ बळी घेतले. तसेच प्रथम श्रेणीतील त्याची कारकीर्द बरीच लांबलचक राहिली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो दोन दशके खेळला. त्याने प्रथम श्रेणीत 140 सामने खेळले ज्यात त्याला 542 बळी घेण्यात यश आले. त्याने 134 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 175 बळी घेतले आहेत.

Cricket भारतीय क्रिकेटपटू निवृत्त

याशिवाय नदीमच्या नावावर 150 ट्वेंटी-20 सामन्यात 125 बळी आहेत. एकूणच त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण 850 बळी घेतले आहेत. 2018-19 विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळताना नदीमने राजस्थानविरुद्ध 10 षटकांत 10 धावा देऊन आठ बळी घेण्याची किमया साधली होती.

नदीम आयपीएलमध्येही खेळला पण त्याला फार काही करता आले नाही. तो 2011 पासून आयपीएल खेळत होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटल्समधून केली आणि बराच काळ या फ्रँचायझीसाठी खेळला. 2019 मध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये आला आणि तीन हंगाम या संघात राहिला. 2022 मध्ये त्याला लखनौ सुपर जायंट्स या नवीन संघाने खरेदी केले. नदीमने आपल्या कारकिर्दीत एकूण 72 आयपीएल सामने खेळले आणि 48 बळी घेतले.

News Title- Former Team India player and 850 wicket taker Shahbaz Nadeem has announced his retirement

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो

“तुम्ही सरकारकडे काही मागू नका…”; नाना पाटेकर स्पष्टच बोलले