घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा निराशेत गेलेली दिसली.

सानियाने सतत काही न काही पोस्ट करत आपल्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या. ती सतत सोशल मिडियावरती सक्रिय असते. मात्र, आता तिने आपल्या नव्या आयुष्याला जगण्यास सुरुवात केली आहे. तिने आता आपल्या भूतकाळाला मागं टाकलं आहे.

सानिया मिर्झाची पोस्ट

सानियाने (Sania Mirza) पुन्हा एकदा आंनदी आणि सुखी आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे. शोएबसोबत प्रेमविवाह केल्याने तिला या गोष्टींचा बराच त्रास झाला असणार,मात्र ही गोष्ट कायमच धरून ठेवता येणार नाही. म्हणूनच ती आपल्या मुलासोबत आता आनंदी क्षण व्यतीत करत आहे. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. ज्यात सानिया आनंदी दिसत आहे.

सानिया मिर्झा हिच्यासाठी दोन आठवडे फार आनंददायी ठरले आहेत. सानियाने तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत खास क्षण व्यतीत केले आहेत. सोशल मीडियावर याचे फोटो देखील तिने पोस्ट केले आहेत. दुबईत सानिया तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत होती.

सानियाची कुटुंबासोबत धमाल

यावेळी सानियाने (Sania Mirza) गायक आतिफ असलम याचा परफॉर्मेन्स देखील बघितला. घटस्फोटानंतर सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पतीची साथ सुटल्यानंतर सानिया तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत आनंदाने जगत आहे. या ट्रीपमधील फोटो तिने पोस्ट केले आहेत. याला क्षणातच अनेक कमेंट आणि लाईक येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया अनेक सामाजिक घटनाबद्दलही प्रतिक्रिया नोंदवत असते. मागे तिने अर्बन कंपनीची जाहिरात ‘छोटी सोच’वर प्रतिक्रिया देत स्वतःच्या आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. जेव्हा मी डबल्सच्या जगातील अव्वल खेळाडू होते, तेव्हा मी संसार कधी थाटणार… हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते, असा खुलासा सानियाने पोस्ट करत केला होता.तेव्हा देखील ती चर्चेत आली होती. आता या फोटो पोस्टने सानिया पुन्हा चर्चेत आली आहे.

News Title-  Sania Mirza has fun with her family

महत्त्वाच्या बातम्या –

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाढत्या ट्रॅफिकमुळे मोठा निर्णय

इमरान हाश्मी आणि मौनी रॉयचा किसिंग सीन चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“…ती चूक असेल तर 10 वेळा मला पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता?”

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी पहिल्यांदाच आली समोर, क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!