अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (4 मार्च) शिरूर मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम?, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

यावरच आता अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर अजित पवार यांच्या बद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील वाद-विवाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

उपमुख्यमंत्री अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक होती असं त्यांनी सांगितलं. तसेच जेव्हा एखाद्या मतदारसंघात उमेदवार मिळत नाही तेव्हा तिथे सेलिब्रिटी उमेदवार दिला जातो असंही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली.

मी एक गोष्ट सांगतो की, अजित पवारांनी ज्यांची उदाहणं दिली त्यातल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. माझ्या (Amol Kolhe) मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

खासगीमध्ये झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. पण, तुम्ही नेहमीच या गोष्टींचा उल्लेख करत असाल, वेगवेगळे आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?, असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

“माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे”

तसंच पुढे ते (Amol Kolhe) म्हणाले की, ” शरद पवार यांनी मला संधी दिली त्याप्रती मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील कामगिरी आणि त्या कामगिरीचा रेकॉर्ड पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. तो तुम्ही पाहू शकता.तसंच मी तुम्हाला ठामपणे सांगतो की, मी जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम आहे आणि पुढेही त्या भूमिकेवर ठाम राहीन. शिरूर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.

News Title- Amol Kolhe reply to Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”