असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Asim Sarode | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत आपल्या सोबत 40 आमदारांना घेत भाजपशी युती करत नवीन सरकार स्थापन केलं आहे. त्यावेळी ते गुवाहाटीला गेले होते. माध्यमांनी त्यांना गुवाहाटीला जाण्याबाबत कारण विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी कामाख्य देवीच्या दर्शनासाठी आम्ही गुवाहाटीला गेलो असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी एका एअर हॉस्टेसचा विनयभंग केला असल्याचा आरोप असिम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे.

असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

शिंदे गटाच्या आमदारांवर असीम सरोदे यांनी एअर हॉस्टेसचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या दोन आमदारांना मारहाण करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप असीम सरोदे यांनी केला आहे. याच प्रकरणावरून हा आरोप खोटा असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे.

महापत्रकार परिषदेमध्येच कळालं होतं की असीम सरोदे हे ठाकरे गटाचे पुढारी आहेत, अशी टीका आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यानंतर गुवाहाटीच्या हॉटेलच्या आठ किमीच्या अंतरावर नेऊन दोन आमदारांना मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण कोणी केली आहे? असा सवाल सरोदे यांनी केला आहे.

हे जिथ गुवाहाटीला थांबले होते तिथं ग्राहकांना परवानगी नव्हती. एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या कंपन्यांच्या रूम्स बुकींग केल्या होत्या. त्यांचा एक वर्षांचा कॉन्ट्रॉक्ट झाला होता. वरती ज्या एअर हॉस्टेस राहत होत्या त्यांचा विनयभंग कोणी केला? हे महाराष्ट्रानं शोधायला हवं. दारूच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी केला आहे, असं सरोदे म्हणाले.

संजय शिरसाट यांचा पलटवार 

महापत्रकार परिषद पार पडली होती. त्यावेळी ते वकिल म्हणून बोलायला हवे होते. त्यांच्या बोलण्याच्या अविर्भावामध्ये ते एक पुढारी म्हणून बोलत होते, त्याचवेळी माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली हा ठाकरे गटाचा नेता आहे, असा हल्ला संजय शिरसाट यांनी केला आहे.

तुला कुठं स्वप्न पडलं? तिथे मीडिया, पोलिस यंत्रणा, सर्व सुरक्षा होती. त्यांना दीड ते पाऊणे दोन वर्षानंतर जाग आली आहे. हे आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आता खूश होतील. ज्या भावनेतून आरोप केले आहेत त्यांना कवडीचीही किंमत देणार नाही असं संजय शिरसाट यांनी हल्ला केला आहे.

News Title – Asim Sarode claime on Shinde mla 

महत्त्वाच्या बातम्या

शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत!

‘माझी मान कापली तरीही…’; मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले

बीडकरांसाठी धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा!

Post Office ची जबरदस्त स्कीम; दर महिन्याला कराल बक्कळ कमाई

‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत