शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahashivratri 2024 Special | हिंदू धर्मात भगवान शिवाची विशेष प्रकारे पूजा केली जाते. लवकरच प्रसन्न होणाऱ्या देवतांमध्ये भगवान शिव पहिल्या क्रमांकावर आहेत. म्हणून त्यांना ‘भोलेनाथ’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे भोलेनाथ (Mahashivratri 2024 Special) यांना प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त आपापल्या परीने पूजा करतात.

त्यातच महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत मोठा दिवस असतो. संपूर्ण देशात या वर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाईल. तसं प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीची महिमा मोठी आहे.

महाशिवरात्री स्पेशल

हा आठवडा महाशिवरात्रीचा आहे. आतापासूनच भक्त याची तयारी करत आहेत. यानिमित्त अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रम देखील आखले जातात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. मात्र, शिवलिंगवर जल अर्पण (Mahashivratri 2024 Special) करण्याचे देखील काही नियम सांगितले आहेत.

शास्त्रात शिवलिंगावर जल कधी अर्पण करू नये, याचे नियम सांगितले आहेत. आता महाशिवरात्री निमित्त तुम्ही ते नियम जाणून घ्यायला हवेत. धार्मिक शास्त्रानुसार भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. तुम्हीही याचे नियम जाणून घेतले तर, तुमच्याकडून चुका होणार नाहीत.

शिवलिंगावर जल अर्पण केव्हा करावे?

शास्त्रानुसार शिवलिंगावर पहाटे 5 ते 11 या वेळेत जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. पहाटेच उठून स्नान करून भगवान शिवाची आराधना केली तर, शिव प्रसन्न होतात. पहाटेच शिवलिंगावर जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

‘यानंतर’ शिवलिंगावर जल अर्पण करू नये

शिवपुराणनुसार सूर्यास्ता झाल्यानंतर शिवलिंगावर (Mahashivratri 2024 Special) जल अर्पण करु नये. त्याच बरोबर शिवलिंगाची सजावट करुन जल अर्पण करणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. मात्र, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात महादेवाला सूर्यास्तानंतरही जल अर्पण करु शकता.

शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम

शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड उत्तर आणि पश्चिम दिशेला नसावं कारण भगवान शंकराचा खांदा आणि पाठ याच दिशांना आहे. त्यामुळे या दिशेला तोंड करून पाणी अर्पण करू नये. शिवलिंगावर जलाभिषेक (Mahashivratri 2024 Special) करतांना दक्षिण दिशेला तोंड करणं उत्तम मानलं जातं. असं केल्याने जलाभिषेकाचं पूर्ण फळ मिळतं. शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात जल अर्पण करा. चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ असते. मात्र, स्टीलच्या भांड्यातून जल अर्पण करू नये.

News Title- Mahashivratri 2024 Special method of Jalabhishek on Shivlinga
महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका